वडिलांच्या निवृत्तीच्या रकमेसाठी मुलाने ओतले अंगावर पेट्रोल; नगरपरिषदेच्या इमारतीत थरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ozar

वडिलांच्या निवृत्तीच्या रकमेसाठी मुलाने ओतले अंगावर पेट्रोल

ओझर (जि.नाशिक) : ग्रामपंचायतीचे कर्मचारी दिनेश मंडलीक यांनी वडिलांच्या ग्रॅजुएटी व अर्जित रजेच्या रकमेसाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर (ता.२३) पेट्रोलच्या बाटल्या घेऊन नगरपरिषदेच्या इमारतीत स्वतःला कोंडून घेतले. काय घडले नेमके?

पेट्रोलच्या बाटल्या घेऊन घेतले कोंडून

जगन्नाथ गोविंद मंडलीक हे ३० मार्च १९ ला ३९ वर्ष सेवा करून निवृत्त झाले. वडिलांची ग्रॅज्युएटी दोन लाख त्रेसष्ट हजार शंभर आणि अर्जित रजेची रक्कम दोन लाख एकोणऐंशी हजार नऊशे चौऱ्याऐंशी अशी एकूण पाच लाख एकोणपन्नास हजार रुपये साडेतीन वर्ष उलटूनही मिळत नसल्याने ते वैतागले होते. वडिलांचेही १० एप्रिल २१ ला कोविड लाटेत निधन झाले, त्यात तीन महिन्यापासून पगार नाही. आम्ही कर्जबाजारी झालो आहोत. हक्काची रक्कम न मिळाल्याने दिनेश यांनी कोंडून घेतले. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती. तहसीलदार शरद घोरपडे, मंडल अधिकारी कुलकर्णी, तलाठी शिर्के व पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांनी दिनेश मंडलीक यांना समजवण्याचा प्रयत्न केला. नंदू मंडलीक, प्रदीप आहेर, प्रकाश महाले, प्रशांत पगार, रूपभाई पटेल यांनी त्याची समजूत काढून आठ दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आलेखी आश्वासन दिले. त्यानंतर दिनेश मंडलीक यांनी आत्मदहण करण्याचा निर्णय मागे घेतला.

हेही वाचा: 'तो' कायदा आणा, मग महिलांवरील अत्याचार थांबतील - राज ठाकरे

लेखी आश्वासनानंतर आत्मदहन मागे

ओझरच्या ग्रामपंचायतीत प्रशासकिय अधिकारी नाही, त्यामुळे पैसे असूनही कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत. शासनाने आठ दिवसात कर्मचारी आणि प्रशासनाच्या बाबतीत कार्यवाही न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल - नंदू मंडलीक, एक त्रस्त नागरिक.

हेही वाचा: केंद्राची नकारात्मक भूमिका ओबीसींना अडचणीत आणणारी - भुजबळ

Web Title: Attempted Self Immolation For Fathe Retirement Money

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikself immolation
go to top