esakal | कोविड सेंटरचे एक रुपयात ऑडिट! महापालिका आयुक्तांची मान्यता

बोलून बातमी शोधा

covid center
कोविड सेंटरचे एक रुपयात ऑडिट! महापालिका आयुक्तांची मान्यता
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील दुर्घटना, तसेच नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे स्ट्रक्चरल ऑडिट महापालिकेतर्फे केले जाणार आहे. नाशिकच्या सिव्हिल टेक संस्थेने एक रुपयात ऑडिट करून देण्याची तयारी दाखविली आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी संस्थेला ऑडिटची मान्यता दिली.

हेही वाचा: असे घडले मृत्यूतांडव! नाशिक ऑक्सिजन गळतीची घटना cctv मध्ये कैद; पाहा VIDEO

सिव्हिल टेक कंपनीचा निर्णय

महापालिकेतर्फे शहरात ठक्कर डोम, मीनाताई ठाकरे क्रीडासंकुल, राजे संभाजी स्टेडियम, समाजकल्याण, मेरी येथे कोविड सेंटर उभारले आहे. मानवनिर्मित किंवा नैसर्गिकनिर्मित आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने कोविड सेंटरचे स्ट्रक्चरल ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट, फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेच्या स्ट्रक्चरल ऑडिट पॅनल वरील मे. सिव्हिल टेक या कंपनीने महापालिकेने उभारलेल्या सर्व कोविड सेंटरचे स्ट्रक्चरल ऑडिट एक रुपया दराने काम करून देण्यास सहमती दर्शविली आहे. कंपनीने महापालिकेला तसे पत्र दिल्यानंतर आयुक्त जाधव यांनी संमती दिली.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती : संशय बळावला! ऑक्सिजन ठेकेदार कंपनीचा लागेना थांगपत्ता

‘बॉश’कडून शंभर खाटा

नाशिक येथील बॉश कंपनीने सीएसआर फंडातून नवीन बिटको रुग्णालयात शंभर बेडचे कोरोना कक्ष उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली. येत्या तीन दिवसांत कोरोना कक्ष उभारण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे. बॉश कंपनीचे जनरल मॅनेजर शशिकांत चव्हाण व कंपनीचे सीएसआर फंड अधिकारी राहुल आहेर यांनी तयारी दर्शविल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.