Nashik News: 32 वर्षांपासून रक्तदान करून वाढदिवस साजरा करणारा अवलिया!

Avinash Thackeray donating blood on his birthday
Avinash Thackeray donating blood on his birthdayesakal

Nashik News : एरवी वाढदिवस म्हटला की मित्रपरिवार आणि कुटुंबीयांना घेऊन जंगी पार्टी करण्याची प्रथा आहे. मात्र १ मेस असणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजासाठी काहीतरी उपयुक्त काम केले पाहिजे या उद्देशाने ३२ वर्षांपासून रक्तदान करणारा अविनाश ठाकरे हा अवलिया आपल्या शहरात आहे.

केटीएचएम महाविद्यालयासमोर सिटी टेलिकॉम ॲन्ड कॉम्प्युटर्स या फर्मचे संचालक श्री. ठाकरे हे अभियंता आहेत. (avinash thackeray celebrates birthday by donating blood for 32 years Nashik News)

मूळचे वाखारी पिंपळगाव (ता. देवळा) या गावचे ते रहिवासी आहेत. त्यांचा ए पॉझिटिव्ह हा रक्तगट असलेल्या कुणाही व्यक्तीला रक्ताची गरज असेल तर ते नेहमी तयार असतात. आजपर्यंत ४० वेळा त्यांनी रक्तदान केले आहे.

माजी शिक्षक वडील गोपीनाथ ठाकरे, आई हिराबाई, भाऊ अमोल, पत्नी रूपाली, आयसीआयसीआय बँकेत हैदराबाद येथे अधिकारी असलेली मुलगी मधुरा, मुलगा अनुज यांनादेखील त्यांच्या या अनोख्या वाढदिवस सेलिब्रेशनचा अभिमान आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Avinash Thackeray donating blood on his birthday
Nandur Madhmeshwar Bird Sanctury : पक्षी अभयारण्यातील नांदूरच्या राणीचे ऐन उन्हाळ्यात वीण!

१ मेस ५१ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केल्यानंतर या उपक्रमाबद्दल राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक व औरंगाबाद प्रदेश नियंत्रण समिती क्रमांक दोनचे उपमहाव्यवस्थापक नितीन मैंद,

त्रिमूर्ती हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत सोनवणे, डॉ. राजेश पाटील, आर्किटेक्ट विनय पाटील, आर्किटेक्ट शरद ठोंबरे, सोशल नेटवर्किंग फोरम अध्यक्ष प्रमोद गायकवाड, सुनील सावंत, प्रमोद भदाणे, रणधीर देवरे, सुनील भामरे, दिलीप चव्हाण, अमोल कापडणीस, दीपक वाघ, सुधीर येवला,

प्रशांत कोठावदे, ॲड. लतीश उपासनी, पत्रकार राजेंद्र बच्छाव, अजय जाधव, दत्ता साठे, शरद सोनवणे, डॉ. दीपक खैरनार, दीपक गहिवड, अमोद पाटील, मिलिंद वाळेकर, नितीन शिरोडे आदींनी अभिनंदन केले.

Avinash Thackeray donating blood on his birthday
New Sand Policy : जिल्ह्यात वाळूंसाठी 13 घाटांवर 90 हजार ब्राससाठी निविदा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com