Nashik News: टंचाई आराखड्यास मंजुरीची प्रतीक्षा; ZPकडून दुरुस्तीसह 6.55 कोटींचा फेरआराखडा सादर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZP Nashik

Nashik News: टंचाई आराखड्यास मंजुरीची प्रतीक्षा; ZPकडून दुरुस्तीसह 6.55 कोटींचा फेरआराखडा सादर

नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ६.५५ कोटींचा जिल्ह्याचा टंचाई आराखडा सादर झाला असून, २० दिवस उलटूनही त्याला मंजुरी मिळालेली नाही. फेब्रुवारीच उन्हाच्या झळा लागत असल्याने ग्रामीण भागात टंचाई जाणवू लागली आहे.

जिल्हयात अद्याप टॅंकरची मागणी नोंदविलेली गेली नसली तरी, तापमानात जशीजशी वाढ होईल तसतशी टॅंकरची मागणी होऊ शकते. यासाठी टंचाई कृती आराखड्यास लवकर मंजुरी मिळावी अशी मागणी होऊ लागली आहे. (Awaiting Approval of water Scarcity Plan six half crore revised plan submitted by ZP with amendments nashik news)

दरवर्षी जिल्ह्यातील किमान शंभराहून अधिक गावांना टँकरची गरज भासते. गतवर्षी टंचाईची तीव्रता कमी होती. यंदाही तशीच परिस्थिती राहील असा अंदाज आहे. त्यासाठी आराखडा जिल्हा परिषदेकडून तयार करण्यात आला असून तो जिल्हाधिकाऱ्‍यांकडे ३० जानेवारी दरम्यान पाठवला आहे.

यंदा ४१२ गावे, ६३३ वाडया अशा एकूण १०४५ गाव-वाडया यावरील टंचाईची शक्यता लक्षात घेऊन ६ कोटी ६१ लाख रुपयांचा आराखडा तयार तयार आहे. यात टँकरव्दारे पाणी पुरवठा करणे, टंचाईची तीव्रता वाढल्यास खासगी विहिरी अधिग्रहीत करणे, विहिरींचे खोलीकरण करणे यावर प्रामुख्याने भर देण्यात आला होता.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

जिल्हाधिकारी कार्यालयाने तपासणी करून त्यात काढलेल्या त्रुटीसह फेरआराखडा सादर करण्यास सांगितले. त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने त्यात दुरुस्ती करून ६.५५ कोटींचा फेरआराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. या आराखड्यास मंजुरीचा प्रतीक्षा आहे.

गतवर्षीच्या तुलनेने घट

यंदा उशिरापर्यंत पाऊस झाला असला तरीही उन्हाचा कडाका वाढला तर मार्चमध्येच अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते. त्याला सामोरे जाण्यासाठी संभाव्य टंचाई आराखडा तयार करण्यात आला. गतवर्षी ५७९ गावे, ९२२ वाडया यासाठी ८ कोटी ६५ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या आराखड्यात घट झाली आहे.

टॅग्स :NashikZPWater Scarcity