Nashik Crime : सिन्नर फाटा येथे फुगे विक्रेत्याचा चाकूने भोसकून खून | Balloon seller stabbed to death in Sinner Phata Nashik Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

Nashik Crime : सिन्नर फाटा येथे फुगे विक्रेत्याचा चाकूने भोसकून खून

Nashik Crime : सिन्नर फाटा येथे किरकोळ कारणाच्या वादातून रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक चार च्या बाहेर एका 21 वर्षे वयाच्या युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना आज सायंकाळच्या दरम्यान घडली दरम्यान या घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून खून केल्यानंतर आरोपी हा फरार झाला आहे.

या घटने प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. (Balloon seller stabbed to death in Sinner Phata Nashik Crime)

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार च्या बाहेर फुगे विक्रेत्यांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

त्यानंतर संबंधित संशयित आरोपीने अजय काळे व 21 या युवकावर चाकूने वार केला या घटनेनंतर संशयित आरोपीने आणखी एकावर हल्ला केला त्यात संबंधित युवक जखमी असल्याचे समजते.

दरम्यान सदरची घटना समजतात नाशिक रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व व घटने प्रकरणी माहिती घेतली तसेच मयत युवकाच्या नातेवाईकांचे जाब जबाब घेण्याचे काम सुरू आहे. मयत अजय काळे यांच्या पश्चात पत्नी दोन मुली असा परिवार आहे. काळे हा औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात राहणारा आहे.