Nashik Fraud Crime : बनावट खाते उघडून बँकेची फसवणूक | Bank fraud by opening a fake account nashik fraud crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Nashik Fraud Crime : बनावट खाते उघडून बँकेची फसवणूक

Nashik Fraud Crime : बनावट कागदपत्र तयार करून विविध लाभार्थ्यांच्या नावावर गृहकर्ज काढून स्टेट बँक ऑफ इंडियाची लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Bank fraud by opening a fake account nashik fraud crime)

बँकेचे मुख्य शाखा अधिकारी यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित विवेक उगले याने संशयित अजय आठवले, रोशनी जयस्वाल, संतोष जयस्वाल, राजू एस कलमट्टी, आश्विन साळवे, किरण आठवले यांच्याशी संगतमत केले.

त्यांचे बनावट कागदपत्र तयार करून सर्वांच्या नावावर विविध रकमेचे गृहकर्ज काढले. बिल्डराच्या नावे अशोकस्तंभ येथील बिझनेस बँकेमध्ये बनावट खाते उघडले. त्याच पद्धतीने शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेत बनवत खाते उघडण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मंजूर झालेले सुमारे ८६ लाख १० हजारांची रक्कम गृहकर्जाची रक्कम त्या दोन्ही खात्यांमध्ये वर्ग केली. अशी माहिती तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केली. कर्ज काढूनही संशयित कर्जदार कर्जाची रक्कम परतफेड करत नसल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.

त्यांनी अधिक चौकशी केली असता, फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. बँकेचे मुख्य शाखा अधिकारी प्रकाश सावंत यांच्या तक्रारीवरून सातही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.