Nashik News : रविवार कारंजावरील ‘ते’ बॅनर उतरविले; सरकारवाडा पोलिसांची कारवाई

A banner put up by the Shinde group at raviwar Karanja on Sunday.
A banner put up by the Shinde group at raviwar Karanja on Sunday.esakal

नाशिक : राज्यभरात वीर सावरकर मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापलेले असताना त्याचे पडसाद नाशिकमध्येही उमटले. शहरात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाविरुद्ध बॅनरबाजी करून डिवचण्याचा प्रयत्न केला.

मात्र, ठाकरे गटाने सदर बॅनर खाली उतरवून बाजूला ठेवला. त्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी ठाकरे आणि शिंदे गट समोरासमोर येण्याची शक्यता गृहित धरुन बॅनर ताब्यात घेतला. दरम्यान, या बॅनरवरील मजकुराची मात्र शहरभर चर्चा रंगली होती. (banner on Sunday raviwar karanja taken down by Sarkarwada Police Nashik News)

मालेगाव येथील जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानास्पद वक्तव्य केल्याने काँग्रेसचे राहुल गांधी यांना इशारा दिला तर, खा. संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता.

याच मुद्द्यावरून शिंदे गटाने खा. राऊतांना बॅनरबाजी करून प्रत्युत्तर दिले. रविवार कारंजा येथील यशवंत मंडईवर शिवसेना शिंदे गटाने ‘आम्ही सारे सावरकर’ अशा आशयाचा बॅनर लावला होता. त्यात एका बाजूला काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला स्व. बाळासाहेब ठाकरे जोड्याने मारत असल्याचे छायाचित्र आहे.

या चित्राखाली सावरकरांचा अपमान झाल्यानंतर बाळासाहेबांनी स्वतः रस्त्यावर उतरून निषेध केला होता, असे वाक्य आहे. तर बॅनरवरील दुसऱ्या बाजूला खा. संजय राऊत आणि खा. राहुल गांधी यांचे गळ्यात गळा घालून काहीतरी बोलत असल्याचे छायाचित्र आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

A banner put up by the Shinde group at raviwar Karanja on Sunday.
Nashik Political News | राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न : सांगळे

या चित्राखाली ‘हेच खरे गद्दार ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांची आणि हिंदुत्वाशी गद्दारी केली. खा. राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान करतात, तेव्हा संजय राऊत हे त्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतात’ अशा आशयाचा मजकूर छापण्यात आला आहे.

दरम्यान, या बॅनरची माहिती कळताच ठाकरे सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब कोकणे, पप्पू टिळे यांनी हा बॅनर खाली उतरविला. त्यानंतर सरकारवाडा पोलिस दाखल झाले आणि त्यांनी हा बॅनर ताब्यात घेत परिसरातील वातावरण सुरळीत राहण्यासाठी त्या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे.

A banner put up by the Shinde group at raviwar Karanja on Sunday.
Politics : कर्नाटक विधानसभेच्या जागांचं सध्याचं गणित काय, कोणाकडं किती आहेत जागा? जाणून घ्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com