BDO Transfer : जिल्हयातील 4 गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या | BDO Transfer Transfer of 4 Group Development Officers in district nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Transfers news

BDO Transfer : जिल्हयातील 4 गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या

BDO Transfer : ग्रामविकास विभागाच्या बदल्यांमध्ये गुरूवारी (ता.२५) पहिल्या टप्यात गट ‘अ’ मधील ३८ गटविकास अधिकारी यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात नाशिक जिल्हयातील चार गटविकास अधिकारी यांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रमुख वर्षा फडोळ यांची देखील बदली झाली आहे. (BDO Transfer Transfer of 4 Group Development Officers in district nashik news )

ग्रामविकास विभागाकडून गुरूवारी आदेश काढण्यात आले. यात जिल्हयातील निफाड तालुका गटविकास अधिकारी संदीप कराड यांची पाथर्डी पंचायत समिती (अहमदनगर) येथे बदली झाली आहे.

त्यांच्या रिक्त जागी चांदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांची बदली झाली आहे. सुरगाण्याचे गटविकास अधिकारी दीपक शामराव पाटील यांची जिल्हा परिषदेतील (पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग) जलजीवन मिशन विभागाच्या प्रकल्प संचालकपदी बदली झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या पदावर कार्यरत असलेल्या वर्षा फडोळे यांची बदली झाली असून त्यांना अद्याप पदस्थापना मिळालेली नाही. पेठ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून धुळे जिल्हयातील साक्रीचे गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यंवंशी यांची बदली झाली आहे.

मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात रोजगार हमी योजनेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारीपदावर बदली झाली आहे.

टॅग्स :NashikTransfers