
Nashik Development: नाशिकमध्ये जमीन भाडे तत्त्वावर देण्याचा भिवंडी पॅटर्न
''सुवर्ण त्रिकोणातील मुंबई -पुणे -नाशिक या सुवर्ण कोनातील एक बाजू असलेले नाशिक हे भविष्यातील इंडस्ट्रिअल हब होणार यात शंका नाही त्याला कारण म्हणजे एअर कनेक्टिव्हिटी ग्रीन प्रिंट व समृद्धी महामार्ग तसेच लिहीत तत्त्वावर जागा देण्याचा भिवंडी पॅटर्न नाशिकमध्ये रुजत चालला आहे.
शेतकरी देखील कृषी उत्पन्न बरोबरच इंडस्ट्रिअल अर्थात औद्योगिक उद्दिष्टासाठी शहराला लागून असलेली जागा लेजवर देत आहे यातून १५ ते २४ टक्क्यांपर्यंत नफा मिळतो म्हणून नाशिक हे इंडस्ट्रिअल होत आहे.'' - विक्रांत मते, संचालक, फिनिक्स इंडस्ट्रिअल पार्क.
पूर्वी नाशिकची ओळख धार्मिक शहर म्हणून होते कालांतराने नाशिकने कुस बदलले तांबे व पितळ धातूचे भांडे तयार करण्याचा उद्योग स्थिरावला चिवडा उद्योगाने व्यवसायाचे पंख विस्तारले गेले.
ही गोष्ट फार पूर्वीची त्यानंतर सातपूर व अंबड औद्योगिक वसाहत स्थापन होऊन एक औद्योगिक शहर म्हणून नकाशावर उदयाला आले उद्योगांचा विस्तार फक्त शहरापुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातही फाइल लावला सिन्नर शिंदे व पळसे मनमाड इगतपुरी घोटी गोंदे वाडीवरे मालेगाव ही प्रमुख औद्योगिक केंद्रे बनली सातपूर अंबड औद्योगिक क्षेत्रात इंजिनिअरिंग उद्योगाने जोर पकडला महिंद्रा व मायको या कंपन्यांचा विस्तार झाला कालांतराने इलेक्ट्रिक समूहातील उद्योग आले.
कृषी प्रक्रियेवर आधारित उद्योगांची एन्ट्री झाली आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ द्राक्ष पंढरी या नावलौकिकामुळे कॅपिटल ऑफ वायनरी म्हणून नावाजले १६ हा जागतिक ब्रँड नाशिकमध्ये आला त्यामुळे नाशिकचे नाव जगभर पोहोचले औद्योगिक केंद्र म्हणून राज्यातील पहिल्या पाच शहरात नाशिकचे नाव आले तरी औद्योगीकरणाचा हवा तसा वेग घेता आला नाही हे देखील तितकेच खरे याला काही प्रमाणात राजकीय तर काही प्रमाणात पायाभूत सुविधांचा अविकास ही कारणे आहेत.
परंतु स्वच्छ हवामान पाणी व जमिनीची उपलब्धता तसेच कुशल मनुष्यबळ या महत्त्वाच्या कारणांमुळे नाशिकची प्रगती हळुवार का होईना होताना दिसत आहे. परंतु आता काही महत्त्वपूर्ण बदलामुळे विकासाचा वेग वाढला यात शंका नाही. याला काही महत्त्वाचे कारणे आहेत सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे एअर कनेक्टिव्हिटी. जे शहर राज्यातील व देशातील महत्त्वाच्या शहरांना विमान सेवेने जोडले आहे, त्या शहरांचा झपाट्याने विकास झाला हे इतिहास सांगतो, तीच परिस्थिती नाशिकच्या बाबतीत आहे.
नाशिकमध्ये एअर कनेक्टिव्हिटी हळुवार वाढत आहे. दिल्ली, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, कोलकता, बंगळूर ही महत्त्वाची शहरे विमानसेवेने नाशिकची जोडली गेली आहे. भविष्यात विमान सेवेचा विस्तार आणखीन वाढणार यात शंका नाही, त्याला कारण म्हणजे एक तर उत्तर महाराष्ट्राची राजधानी व दुसरे म्हणजे मुंबई विमानतळावर होणारी एअर ट्रॅफिक जाम यामुळे नाशिकमधून प्रवास करणे कधीही परवडणार त्यातून हवाई सेवेचा विस्तार आणखीन वाढणार आहे.
त्या शिवाय ओझर विमानतळाची धावपट्टी जवळपास ३.२ किलोमीटर असून देशातील सर्वात मोठी धावपट्टी असल्याचे मानले जाते. विमानतळाला लागूनच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कारखाना असल्याने विमानांचे सर्विसिंग देखील येथे होईल. महाराष्ट्रातील सर्वात वेगवान समजला जाणारा समृद्धी महामार्ग नाशिकमधून जात आहे, ही नाशिकच्या विकासासाठी मोठी जमेची बाजू मानता येईल. समृद्धी महामार्गामुळे मुंबई सोबतच विदर्भ देखील जोडला गेला आहे.
समृद्धीचा दुसरा टप्पा डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत सुरू होईल म्हणजे मुंबईचे अंतर अवघे दीड तासावर येणार तर नागपूर अवघ्या सहा ते सात तासांच्या अंतरावर आले आहे. समृद्धी महामार्गाला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या वावी व घोटी येथे दोन इंटरचेंज देण्यात आले आहे. येथे भविष्यात बिझनेस सेंटर उदयाला येईल, त्यामुळे दळणवळण आणखीन पक्के होईल. नाशिकच्या विकासाला वेग देणारा दुसरा महत्त्वाचा मार्ग म्हणजे सुरत- चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग.
या महामार्गाचा प्रवास नाशिक जिल्ह्यातून १२२ किलोमीटरचा आहे. नाशिक पासून सुरत अवघ्या दोन तासाच्या अंतरावर येईल तर आडगाव येथे ग्रीनफिल्ड महामार्गाला एक इंटरचेंज देण्यात आला आहे नाशिक महापालिका हद्दीला लागून हा इंटरचेंज असल्याने भविष्यात येथे बिझनेस सेंटर उदयाला येईल.
नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे मुळे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर नाशिक पासून नजीकच्या अंतरावर येईल रेल्वे सोबतच सहा पदरी महामार्गाचे विस्तारीकरण होत असल्याने रोड व रेल्वे कनेक्टिव्हिटी ने नाशिक पुणे ही दोन महत्त्वाची शहरे जोडले जातील त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर नगर जिल्ह्यातील संगमनेर पुढे नारायणगाव जुन्नर या महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांना देखील त्याचा लाभ होईल.
पायाभूत सुविधांच्या बाबतीत नाशिक सक्षम होत असतानाच राज्य शासनाने नवीन डी पी सी आर मंजूर केला. त्यात शेतजमीन ही औद्योगिक कारणासाठी वापरण्यास परवानगी दिली. याचा सर्वाधिक फायदा नाशिकला होताना दिसत. नाशिक मध्ये सातपूर व अंबड हे दोन औद्योगिक क्षेत्र आहे या औद्योगिक क्षेत्रांमध्ये सध्या परिस्थितीमध्ये उद्योग उभारणीसाठी जागा उपलब्ध नाही त्यामुळे या औद्योगिक वसाहतींना लागून असलेल्या शेत जमिनी भाडेतत्त्वावर घेतल्या जात आहे. नाशिकमध्ये जमिनीचे भाव लग्नाला भेटले त्यामुळे जागा विकत घेणे परवडत नाही.
त्यामुळे प्लीज अर्थात भाडेतत्त्वावर या जागा घेऊन उद्योग उभारणी होत आहे उत्तर महाराष्ट्राला या धोरणाचा अधिक फायदा होताना दिसत आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी भागामध्ये शेतजमिनी घेऊन त्यावर वेअर हाऊस व उद्योग उभारले गेले. मात्र सध्या तिथे जागा नाही त्यामुळे तिकडचे उद्योग नाशिकच्या दिशेने सरकत आहे.
बळीराजाला उद्योजक होण्याची संधी
राज्य शासनाने शेत जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून वापरण्यास परवानगी दिल्याने त्याचा फायदा नाशिक शहरासह महापालिका हद्दीला लागून असलेल्या शेत जमीन मालकांना होणार आहे. औरंगाबाद रोडवर मोठ्या प्रमाणात मंगल कार्यालय व लॉन्स तयार होत आहे, त्याचप्रमाणे येथे औद्योगिक इमारती उभारल्यास त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळण्याची शाश्वती आहे.
दोन ते पाच एकर क्षेत्र एकत्र करून इंडस्ट्रिअल झोन विकसित करता येईल. सध्या नाशिकमध्ये अशा प्रकारचे इंडस्ट्रिअल झोन तयार करण्याकडे कल आहे व बाहेरून देखील विचारणा होत आहे, त्याचा फायदा शेतकऱ्यांना उद्योजक बनण्यासाठी होईल. या माध्यमातून सरासरी १५ ते २४ टक्क्यांपर्यंत उत्पन्न प्राप्त होत असल्याचा अभ्यास आहे.
शेत जमिनीचे तुकडे होत असल्याने सहकार शेती हा नवा पॅटर्न उदयाला येत आहे, त्याच धर्तीवर छोट्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन इंडस्ट्रिअल प्लॉट पाडल्यास त्याचा फायदा उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच औद्योगिक क्षेत्रात वाढ होण्यात देखील होईल. म्हणूनच नाशिक हे भविष्यातील इंडस्ट्रिअल हब होण्याकडे वाटचाल करत असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही.