Yeola Bazar Samiti: भुजबळांचे संचालकांशी गुप्तगु, मात्र नाव आजच ठरणार! सभापतीपदी सविता पवार की संजय बनकर? | Bhujbals talk with director name will decided today Savita Pawar or Sanjay Bankar as Yeola Bazar Samiti Chairman nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yeola Bazar Samiti

Yeola Bazar Samiti: भुजबळांचे संचालकांशी गुप्तगु, मात्र नाव आजच ठरणार! सभापतीपदी सविता पवार की संजय बनकर?

Yeola Bazar Samiti : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी मंगळवारी (ता. २३) नवनिर्वाचित संचालकांची विशेष सभा होणार आहे.

या पार्श्‍वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री व पॅनलचे नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी (ता. २२) नाशिक येथे सर्वच संचालकांशी गुप्तगु केले खरे; पण कुणाच्याही नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही.

त्यामुळे येथील सभापतीचे नाव मंगळवारी सकाळी दहालाच निश्‍चित होणार आहे. (Bhujbals talk with director name will decided today Savita Pawar or Sanjay Bankar as Yeola Bazar Samiti Chairman nashik news)

येथील बाजार समितीत भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १३ जागा जिंकत निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. त्यामुळे भुजबळ ठरवतील त्यांचीच सभापती व उपसभापतीपदी वर्णी लागणार आहे.

नाशिक येथे झालेल्या बैठकीत भुजबळांनी सर्वांची मते जाणून घेतली. त्यानंतर आता प्रथम सभापतीपद राष्ट्रवादीकडे ठेवणार की शिवसेनेला देणार याविषयी उत्सुकता लागून आहे. तथापि, आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेला व त्यातही शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांच्या वहिनी सविता बाळासाहेब पवार, तर उपसभापतीपदी संजय पगार यांची बिनविरोध निवड होणार असल्याची चर्चा आहे.

ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांचे पूत्र संजय बनकर यांचेही नाव सभापतीपदासाठी अग्रस्थानी आहे. भुजबळांनी शिक्कामोर्तब केले नसल्याने दोन्ही नावे गुलदस्त्यात असून, निवडीच्या सभेपूर्वी दूरध्वनीवरून ते नाव जाहीर करतील. त्यामुळे कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागून आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मंगळवारी सकाळी अकराला विशेष सभा होणार आहे. तहसीलदार आबा महाजन या वेळी पीठासन अधिकारी असतील. सभेत पहिल्या दहा मिनिटांत नामनिर्देशन पत्र दिले जातील.

त्यानंतरच्या दहा मिनिटांत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत. सकाळी ११.२१ ते ११.३० या दरम्यान नामनिर्देशन पत्रांची छाननी व वैध नामनिर्देशन पत्राची यादी तयार केली जाईल.

त्यानंतर ११.३१ ते ११.४० दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेणे, तसेच आवश्यकता भासल्यास दुपारी १२.११ ते १२.४० या वेळेत मतदान घेतले जाईल व त्यानंतर लगेचच मतमोजणी करून निकाल घोषित करण्यात येणार आहे.