Nashik News : नेट कनेक्शन न देताच दिले 2 हजाराचे बिल! BSNL चा ग्राहकाला झटका | Bill of 2 thousand was paid without providing net connection BSNL hit customer Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bsnl

Nashik News : नेट कनेक्शन न देताच दिले 2 हजाराचे बिल! BSNL चा ग्राहकाला झटका

Nashik News : पिंपळगाव बसवंत येथील बीएसएनएलकडून तीन महिन्यांपूर्वी वायफायचे कनेक्शन घेतल्यानंतर जोडणी न करताच दोन हजार १३५ रुपयांचे बिल दिल्यामुळे ग्राहकाला मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. (Bill of 2 thousand was paid without providing net connection BSNL hit customer Nashik News)

कोकणगाव येथील मुकुंद भडांगे यांना भारत दूरसंचार निगमच्या सीएससी सेंटरकडून वायफाय सेवा मंजूर करण्यात आली. मात्र त्यानंतर कार्यालयाकडून तीन महिने उलटूनही नेट कनेक्शन जोडले गेले नाही.

त्यासाठी संबंधिताने वारंवार पाठपुरावाही केली, मात्र कनेक्शन दिलेच नाही. आता थेट तीन महिन्यानंतर कार्यालयाने दोन हजार १३५ रुपयांचे बिल दिल्याने भडांगे यांच्यावर मनस्ताप करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भडांगे यांनी वारंवार संबंधित व्यक्तीकडे पाठपुरावा केला. मात्र, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. आता या प्रकरणी तक्रार अर्ज करा, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले आहे. आधीच बीएसएनएल सेवेकडे ग्राहक पाठ फिरवीत असताना अधिकारी व कर्मचारीकडून ग्राहकांना चुकीची बिले दिली जात असल्यामुळे संतापाचे वातावरण आहे.

पिंपळगाव बसवंत येथील बीएसएनएलने सीएससी सेंटरला कनेक्शन देण्याचे अधिकार दिले आहेत. या केंद्रचालकाच्या मनमानीमुळेच भडांगे यांना कनेक्शन जोडणी न करताच बिल दिले गेले आहे,त्यामुळे सदरचे बिल माफ करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी असे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :NashikBSNL