
Nashik News : रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी एचपीटीत रक्तदान शिबिराचे आयोजन!
Nashik News : एचपीटी आर्टस् अँड आरवायके सायन्स महाविद्यालयात 'राष्ट्रीय सेवा योजना आणि शासकीय विभागीय संदर्भ सेवा रूग्णालय' यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. (blood donation camp was organized today at HPT RYK college nashik news)
नाशिकमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. काहीच दिवस पुरू शकेन इतकाच रक्ताचा साठा नाशकात उपलब्ध असल्याने एचपीटी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
'रक्तदान श्रेष्ठदान' या उक्तीप्रमाणे महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी १०० हून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
शिबिराचे उद्घाटन प्राचार्या डॉ. मृणालिनी देशपांडे यावेळी डॉ. पुरूषोत्तम पुरी, डॉ. वैजयंती पुरी यांनी केले. उपप्राचार्य डॉ. प्रणव रत्नपारखी, उपप्राचार्य एल. पी. शर्मा, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आनंदा खलाणे, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. जितेंद्र पाटील, प्रा. राकेश वळवी, एनएसएस महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती कोल्हे, प्रा. शंकर भोईर, प्रा. प्रशांत अहिरे, प्रा. बी.यु. पाटील, प्रा. उज्ज्वला म्हस्के, प्रा. सागर वराडे, प्रा. कैलास सानप तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी शिबिर यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.