Nashik Crime News : अडसरे बुद्रुकला तरुणीचा मृतदेह आढळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nashik Crime News : अडसरे बुद्रुकला तरुणीचा मृतदेह आढळला

घोटी (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील अडसरे बद्रुक येथील शेतशिवारात तरुणीचा मृतदेह आढळला. या युवतीवर अत्याचार करून धारदार शस्त्राने तिचा खून करण्यात आला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची उकल करण्याचे आव्हान घोटी पोलिसांसमोर आहे. (body of young woman found in Adare Budruk rape murder Nashik Crime News)

या प्रकरणी घोटी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
टाकेद परिसरातील अडसरे बुद्रुक गावाच्या करंजी नावाच्या शेतात भाताच्या तनसाच्या गंजीजवळ तरुणीचा मृतदेह आढळला.

प्रारंभी घोटी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली. मात्र उत्तरीय तपासणीत अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, विभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशीबाबत सूचना दिल्या.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

दरम्यान, सरला मारुती चौरे असे मृत तरुणीचे नाव असून तिच्यावर अत्याचार करून धारदार शस्त्राने तिचा खून केला आहे. मृत तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात संशयितांविरोधात अत्याचार व खुनाचा गुन्हा दाखल झाला.

घोटी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर, श्रद्धा गंधास, सहायक उपनिरीक्षक बाळासाहेब राऊत, हवालदार सुहास गोसावी, केशव बस्ते अधिक तपास करीत आहेत.