Kajwa Mohotsav : काजवा महोत्सवासाठी पर्यटकांचे बुकिंग सुरू; या तारखेपासुन निरीक्षणाची संधी | Booking of tourists for Kajwa Festival begins nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kajwa mohotsav

Kajwa Mohotsav : काजवा महोत्सवासाठी पर्यटकांचे बुकिंग सुरू; या तारखेपासुन निरीक्षणाची संधी

Nashik News : पिंपळगावमोरपासून कळसूबाई शिखर, भंडारदरा धरण पाहण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. परिसरातील कळसूबाई हरिश्‍चंद्रगड अभयारण्यात काजवा महोत्सव बघण्यासाठी यावर्षी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असून अनेकांनी अगोदरच परिसरातील हॉटेल बुकिंग करून ठेवले आहे. (Booking of tourists for Kajwa Festival begins nashik news)

सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात पावसाळ्याच्या अगोदर काजव्यांची चकमक सुरू होत असते ही चकमक म्हणजे पावसाची चाहूलच असते. हिला, बेहडा, सादोडा यासारख्या झाडांवर स्वयंप्रकाशित काजवे एकाच वेळेस लयबध्दपद्धतीने चमकत असतात. या काजव्यांचा चमत्कार बघण्यासाठी दरवर्षी २५ मे ते १५ जूनपर्यंत हजारो पर्यटक भंडारदऱ्यात हजेरी लावत असतात.

याही वर्षी काजव्यांची चमचम वेळीच सुरू होण्याची शक्यता असून अनेक पर्यटकांना काजव्यांची करिष्मा व्यवस्थित बघता यावा यासाठी हॉटेल, टेंन्ट, रुम यांची मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी बुकिंग केली आहे.

काही संस्था व मंडळे यांनी काजवा महोत्सवमध्ये वेगवेगळे विविध इव्हेंट आयोजित केले आहे. अनेक आयोजकांनी पर्यटकांना काजवा महोत्सवात आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.

काजवा महोत्सवसाठी होणारी गर्दी लक्षात घेता वनविभागाकडून जोरदार तयारी सुरू असून पर्यटकांना काजव्याचा आनंद घेता यावा म्हणून अभयारण्यातील प्रत्येक गावातील सदस्यांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भंडारदरा धरण परिसरातील हॉटेल्स, व्यावसायिक, सुशिक्षित बेरोजगार तरुण, गाईड व महाराष्ट्र पर्यटन निवास यांनाही पर्यटकांना काजवा महोत्सवात आकर्षित करण्यासाठी विशेष सवलती दिले आहे.

मागील दोन-तीन वर्षांपूर्वी कोरोनामुळे काजवा महोत्सवात विपरीत परिणाम होऊन आदिवासी युवकांचा रोजगार थांबला गेला होता मात्र गत वर्षेपासून पुन्हा काजवा महोत्सव आणि सुरू झाला आहे.यावर्षी काजवा महोत्सव हाउसफुल होणार आहे.

"पर्यटकांनी काजवा महोत्सवाचा आनंद मनमुराद आस्वाद घ्यावा मात्र कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल." - गणेश इंगळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, राजूर

"यंदा काजवा महोत्सवसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने रात्री साडे नऊनंतर अभयारण्य क्षेत्रात प्रवेश दिला जाणार नसून दहानंतर पर्यटकांना अभयारण्य परिसरात फिरता येणार नाही. पर्यटक व त्यांच्या वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे." - गणेश रणदिवे, सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी.

टॅग्स :NashikForest department