Nashik Bribe Crime: लाचखोरांनी गाठली 4 महिन्यात शंभरी! ACB अधीक्षक वालावलकर लाचखोरांसाठी कर्दनकाळ

bribe crime
bribe crimeesakal

Nashik Bribe Crime : ऐरवी पाचशे ते दोन-चार हजारांची लाच घेताना पोलिस, तलाठी, कारकून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद अडकल्याचे नेहमीच समोर येते.

परंतु, गेल्या काही महिन्यांमध्ये सरकारी साऱ्या सोयीसुविधा उपभोगूनही हजारो-लाखोंच्या लाच स्वीकारणारेही नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडत आहेत.

यामागे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर आणि त्यांच्या पथकाने तक्रारदारांवर विश्‍वास कारणीभूत असून, त्यामुळे ‘मोठे मासे’ गळाला लागत आहेत.

दरम्यान, गेल्या साडेचार महिन्यात नाशिक विभागात १०० लाचखोरांना जेरबंद करण्यात आले आहे. (Bribery reached 100 in 4 months ACB Superintendent Valawalkar acion on bribe takers Nashik Bribe Crime news)

श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी गेल्या २२ नोव्हेंबर २०२२ रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली. सरकारी खाबुगिरीने त्रस्त सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आणि पैशांच्या हव्यासापोटी सर्वसामान्यांची छळवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी श्रीमती वालावलकर यांनी आवाहन केले.

त्यानुसार, गेल्या साडेचार महिन्यांमध्ये लाचखोरांसाठी श्रीमती वालावलकर या कर्दनकाळच ठरल्या आहेत. एकापाठोपाठ एक लाचखोरांविरोधातील सापळे यशस्वीरित्या करताना मोठे मासेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागले आहेत. त्यांच्या याकामगिरीचा डंका राज्यस्तरावर होत आहे.

मोठे मासे गळाला

- नंदुरबार येथील प्रादेशिक परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक महेश हिरालाल काळे यांना लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी पकडले.

- ५ डिसेंबर २०२२ : वीज महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय मारुती धालपे (४४) यास १७ हजारांची लाच स्वीकारताना अटक केली.

- ३१ जानेवारी २०२३ : नाशिक भूमीअभिलेख विभागाचे अधीक्षक तथा उपसंचालक असलेला महेशकुमार महादेव शिंदे (रा. पंडित कॉलनी, नाशिक) यास कार्यालयातच ५० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

- २ मार्च २०२३ : उपनिबंधक कार्यालयाच्या सिन्नर तालुका सहायक निबंधक एकनाथ पाटील यास १५ हजार ५०० रुपयाची लाच स्वीकारताना अटक.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

bribe crime
Nashik Bribe: खरेंकडून झालेल्या कारवाईबाबतच्या अनेक धक्कादायक बाबी समोर; निर्णय वादाच्या भोवऱ्यात

- ३ मार्च २०२३ : नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश प्रतापराव पाटील यास ३ लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना पकडले.

- ८ मार्च २०२३ : धुळे येथे वीज वितरण कंपनीतील वित्त व लेखा विभागातील व्यवस्थापक अमर अशोक खोंडे यांना २ लाख रुपयांची लाच घेतांना पकडले.

- ३० मार्च २०२३ : सिन्नरचा तालुका सहायक निबंधक लाचखोरीत अटक झाल्याने या तालुक्याचा अतिरिक्त कार्यभार निफाडचे सहायक निबंधक रणजित पाटील याच्याकडे देण्यात आला असता, त्यासही महिनाभरातच मुंबई नाका हद्दीमध्ये तब्बल २० लाखांची लाच घेताना अटक.

- २२ एप्रिल २०२३ : सिन्नर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय महादेव केदार यांना ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पकडले.

- २७ एप्रिल २०२३ : वीज महावितरणचाच सहायक अभियंता सचिन चव्हाण यास४० हजारांची लाच स्वीकारताना अटक.

- १५ मे २०२३ : दीड महिन्यांपूर्वीच उपनिबंधक विभागातील दोन सहायक निबंधक लाचखोरीत जेरबंद झालेले असताना, या विभागाचा जिल्हा प्रमुख अर्थात जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यास तब्बल ३० लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक

विभागातील कारवाई

वर्ग............... संख्या

वर्ग-१ ........... ६

वर्ग-२............१२

वर्ग-३............४८

वर्ग-४............८

इतर..............९

खासगी .........१७

एकूण............१००

"सरकारी नोकरदाराने लाच घेतोच कशासाठी? चांगले वेतन, सोयीसुविधा असताना केवळ हव्यासापोटी लाचखोरी करतो. वर्ग-१चा अधिकारीही यात अडकले आहेत. नागरिकांनीही सजग राहावे. कोणीही लाचेची मागणी करीत असेल तर त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी प्रत्यक्ष येण्याचीही गरज नाही. निःसंकोचपणे १०६४ या क्रमांकावर संपर्क करावा, निश्‍चितपणे कारवाई केली जाईल."

- शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक.

bribe crime
Nashik Bribe Crime: खरेंच्या ‘लुटमारी’ची एसीबी करणार सखोल चौकशी; 3 दिवसांची पोलिस कोठडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com