जेंव्हा मोकाट वळूच्या तोंडात अडकतो पत्र्याचा डबा..!

मालेगाव : तोंडात डबा अडकलेला वळू आणि रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान उपचार करताना पशु वैद्यकीय अधिकारी व मदतनीस.
मालेगाव : तोंडात डबा अडकलेला वळू आणि रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान उपचार करताना पशु वैद्यकीय अधिकारी व मदतनीस. esakal

मालेगाव (नाशिक) : मालेगाव शहरातील मोकाट फिरणाऱ्या धिप्पाड वळूने पत्र्याचा डब्यातील खाद्यान्न खाण्याच्या नादात खालच्या जबड्यात डबा अडकून घेतला. लहानशे टिनपाट दातात अडकल्याने वळूला दुसरा चारा खाणे बंद झाले. वर्धमान नगरातील नागरिकांनी ही वार्ता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. मोकाट वळूच्या तोंडात अडकलेला डबा काढण्याचा एक थरार रंगला.

रस्त्यावर फेकलेल्या वस्तूत चारा शोधतांना वळूला पत्र्याचा डबा गवसला. डब्यातील खाद्यपदार्थ खाण्याच्या नादात वळूच्या खालच्या जबड्यात हा पत्राचा डबा घट्ट अडकला. अन्य चारा पाणी खाणे पिणे बंद झाले अन्‌ वाघुळ करणे शक्य नसल्याने वळू बेहाल झाला. जखमी वळूची माहिती वर्धमान नगरातील नागरिकांनी मनपा आणि पशुधनविकास अधिकारी डॉ. जावेद शब्बीर खाटीक यांना दिली. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करण्याचा निर्णय घेत दुग्ध उत्पादन पदविका अभ्यासक्रमातील परीक्षार्थी आणि मनपा कर्मचाऱ्यांच्या मदतीने वळूला काबूत आणण्याची मोहीम सुरू झाली.

मालेगाव : तोंडात डबा अडकलेला वळू आणि रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान उपचार करताना पशु वैद्यकीय अधिकारी व मदतनीस.
येवल्यात वीज पडून 2 जनावरे मृत्युमुखी

प्रथमतः जमाव बघताच वळूने धूम ठोकली. वर्धमान नगर, दीपक मेडिकल, समर्थ हौस्पिटल, मोहन टॉकीज या गजबजलेल्या भागात वळूला दोराने जखडून ठेवण्यासाठी थरार सुरू झाला. ताकदवान वळू मदत करणाऱ्यांवर हल्ला करत होता. अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी शिताफीने फासा टाकत झाडाच्या मदतीने वळूला काबूत आणण्यात यश मिळाले. डॉ. खाटीक यांच्या टीमने वळूच्या जबड्यात अडकलेला डबा काढला. तोंडात पत्रा ठिकठिकाणी रुतल्याने जखमा झाल्या होत्या. तत्काळ वेदनाशामक इंजेक्शन तसेच जीवनसत्त्वे, प्रतिजैविके आदी औषधोपचार देण्यात आले आणि वळूची सुटका करण्यात आली.

या वेळी अतुल साळुंखे, कुणाल खैरनार, ललित बाचकर, निलेश साळवे, विनोद बागूल, कुशल सातदिवे, भाऊसाहेब गिरी यांच्यासह राजेश गंगावणे व स्थानिक नागरिक उपस्थित होते. रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाल्याने नागरिकांनी संपूर्ण पथकाचे आभार मानले.

मालेगाव : तोंडात डबा अडकलेला वळू आणि रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान उपचार करताना पशु वैद्यकीय अधिकारी व मदतनीस.
जंगलांत ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ हवाच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com