Nashik Crime News : सायगावमध्ये एकाच रात्री 8 ठिकाणी घरफोड्या

Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal

येवला : उन्हाळा सुरु होताच ग्रामीण भागात चोरट्यांचा सुळसुळाट सुरु झाला असून मंगळवारी (ता.२८) रात्री जळगाव नेऊर येथील नाशिक जिल्हा बँकेला भगदाड पाडून बँक लुटण्याचा प्रयत्न झाला. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सायगावसह परिसरात सुमारे आठ ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला. यात लाखोंच्या रक्कमेचा ऐवज लुटण्यात आल्याचे सांगण्यात येते.

Nashik Crime News
Nashik Fraud Crime: आमिषाला बळी पडून महिलेने गमावली जमा पुंजी; लॉटरीच्या नावाखाली 30 लाखांना गंडा

चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास सायगाव येथील संजय पेंढारे यांच्या घरातील टीव्ही, बस्त्याचे कपडे व एक लाखाचे दागिने चोरून नेले. ज्ञानदेव बारे यांच्या वस्तीवर चोरट्यांनी दहा हजाराची रोख रक्कम चोरली. उत्तम पतंगराव यांच्या घरातील टिव्ही चोरट्यांनी पळवला. साहेबराव सदाफुले यांच्या घरातून तीनशे रुपयांची रोकड नेली.

याच रात्री साहेबराव उशीर, उषाताई बारे, महेश सोनवणे यांच्या घराचे कडी कोयंडा तोडून वस्तू अस्ताव्यस्त फेकल्याचे उघडकीस आले आहे. गोल्हेवाडी येथील शिवाजी जाधवच्या वस्तीवर औषध फवारणी पंपाची मोडतोड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अंदरसूल येथील वाडी वस्त्यांवर भरदिवसा चोरीच्या घटना घडल्या आहे. यामुळे गाव परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे.

Nashik Crime News
Nashik News: स्मार्ट रस्त्यावर नाशिककरांची ‘हर्डल रेस’; दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 15. 26 मिनिटांचा वेळ!

सायगाव ग्रामपंचायत व महाराष्ट्र बँक सेवा केंद्राचे सिसिटिव्ही फुटेजमध्ये मध्यरात्री २ : ४४ ला चौघे व्यक्ती बॅंकेत संचार करत असल्याचे कैद झाले आहे.

एकाच रात्रीत आठ ठिकाणी झालेल्या चोरीमुळे गाव परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तत्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे, पोलिस पिसाळ, श्री. केदारे यांनी घटनास्थळांची पाहणी केली.

Nashik Crime News
Nashik Fraud Crime: शेअर मार्केटमध्ये पैसे डबल करण्याचा मोह पडला भारी; बसला लाखोंचा गंडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com