Nashik Crime : उपसभापतीच्या घरी भरदिवसा जबरी चोरी

crime news
crime newsesakal

Nashik News : निमोण विविध सहकारी संस्थेचे उपसभापती हरीभाऊ शेळके यांच्या डोणगाव ता. चांदवड येथील राहत्या घरी भरदिवसा जबरी चोरी झाली. चोरीत नऊ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. (Burglary at Deputy chairman house nashik crime news )

हरीभाऊ शेळके हे कुटुंबासह आपल्या नातेवाईकांकडे आमरसासाठी बंगल्याला कुलूप लावून गेले होते.

त्याचवेळी संधी साधून भरदिवसा दोन चोरट्यांनी त्यांच्या डोणगाव शिंगवे रस्त्यावरील डोणगाव गावालगत असलेल्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला अन् कपटाचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले रोख चार हजार रुपये, वीस ग्रॅम वजनाची चैन व एक ओमपान, पंधरा ग्रॅम वजनाचा राणीहार, छत्तीस ग्रॅम वजनाचा पट्टी पोत, अठरा ग्रॅम वजनाची शॉट पोत असे एकूण दोन लाख एकाहत्तर रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

crime news
Nashik Crime: महिलांची बदनामी करणारा जेरबंद; महिलांचे फोटो व्हायरल प्रकरण

भरदिवसा रस्त्यालगत अन् गावाजवळ ही जबरी चोरी झाल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.चांदवड चे पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चौधरी, पोलीस हवालदार गुळे, पोलीस हवालदार सांगळे, उत्तम गोसावी हे तपास करीत आहेत

crime news
Nashik Crime: घरगुती गॅस अवैधरीत्या वाहनांमध्ये 4 सिलिंडरसह 17 हजाराचा ऐवज जप्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com