
Nashik Crime News : खाकुर्डीत घरफोडी 3 लाखाचा ऐवज चोरीस
Nashik Crime News : शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही चोरी, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून घरातील रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या वस्तू असा सुमारे तीन लाख ३५ हजाराचा ऐवज पळवून नेला. (Burglary in Khakurdi 3 lakh stolen instead Nashik Crime News)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
खाकुर्डी (ता. मालेगाव) येथील श्याम राजाराम कोठावदे (५३, रा. खाकुर्डी, हल्ली रा. मुरारीनगर, अंबड, नाशिक) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरात ठेवलेले एक लाख रुपये रोख, साडेतीन तोळे वजनाचे मंगळसूत्र, साडेचार तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट, सहा ग्रॅम वजनाच्या पुतळ्या,
१० ग्रॅम वजनाच्या कानातील डुल, नथ, अंगठ्या असा सोन्याचा २ लाख ५ हजाराचा ऐवज तसेच ३० हजाराचे चांदीचे ग्लास, चमचे, ताट, पूजेच्या वस्तू असा एकूण ३ हजार ३५ हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. मंगळवारी (ता. २) ते मंगळवारी (ता. १६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.