Nashik Fraud Crime : ऑनलाइन वीजबिल भरणे पडले महाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online Fraud

Nashik Fraud Crime : ऑनलाइन वीजबिल भरणे पडले महाग

नाशिक : ऑनलाइन (Online Fraud) वीजबिल भरण्याचा बनाव करीत भामट्याने एका महिलेच्या मोबाईलचा ताबा मिळवून ऑनलाइन पद्धतीने सुमारे दोन लाख रुपयांचा गंडा घातला. (By pretending to pay electricity bill online scammer fraud woman for 2 lakh rupees online nashik fraud crime news)

याप्रकरणी सबा कौसर शेख (रा. हॅपी होम कॉलनी) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. सबा यांच्या फिर्यादीनुसार, भामट्याने १७ जानेवारीला स्वतः वीज वितरण कंपनीतील प्रतिनिधी असल्याचे सांगत ऑनलाइन वीजबिल भरण्याचा बनाव केला.

सबा यांना टिम व्ह्यूअर नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर भामट्याने सबा यांच्या मोबाईलचा ताबा मिळवून इंटरनेट बँकिंगचा आयडी व पासवर्ड मिळवून त्या खात्यावरून २ लाख १३ हजार ४९९ रुपये परस्पर इतर बँक खात्यांमध्ये वर्ग केले.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

हा प्रकार लक्षात आल्यानंतर सबा यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार सबा यांच्याशी ज्या मोबाईल क्रमांकावरून भामट्याने संपर्क साधला होता, त्या मोबाईल धारकासह ज्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले त्या बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक सूरज बिजली करीत आहेत.