Nashik News : आखतवाडेत बिबट्याकडून वासरू फस्त; कांदा पिकांतही केली धुमशान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers & destroyed onion crop

Nashik News : आखतवाडेत बिबट्याकडून वासरू फस्त; कांदा पिकांतही केली धुमशान

अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथील बिजोटे शिवारातील शेतात असलेल्या घराजवळील जनावरांच गोठ्यात बिबट्याने प्रवेश करीत वासरू फस्त केल्याची घटना गुरूवार (ता.१६) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. सटाणा वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. (Calf killed by leopard in Akhatwada onion crops destroyed Nashik News)

आखतवाडेसह परीसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्तसंचार असल्याने शेतातील शेतकरी भीतीच्या सावटाखाली आहेत. बिजोटे शिवारातील सुनिता जगन्नाथ पातळपुरे यांच्या (गट क्रमांक २५४) येथे कुटुंबीयांसह राहत असलेल्या घराला लागून जनावरांसाठी गोठा तयार केलेला आहे.

गुरूवार (ता.१६) पहाटेच्या सुमारास गोठ्यातील जनावरांचा हंबरण्याचा आवाज पातळपुरे कुटुंबातील सदस्यांना येत होता. मात्र बाहेरील खराब वातावरण वादळ व वीजांचा जोरदार कडकडाटात यातच खंडित वीजपुरवठा हेमंत पातळपुरे टॉर्चच्या उजेडात बाहेर आले असता त्यांना बिबट्या वासरीवर हल्ला करीत असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

सकाळी आजूबाजूस असलेल्या शेतक-यांना माहिती मिळताच शेजारील भरत खैरनार यांच्या डाळींब बागेत वासराला बिबट फरफटत नेल्याचे दिसून आले. दरम्यान बिबट्याकडून कांद्याच्या शेतातही धुमशान केल्याचे दिसून आले.

अजय पातळपुरे यांनी वनविभागाला माहिती दिली असता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखल होत पंचनामा केला. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याकडून पाळीव जनावरांवर रात्रीतून हल्ला होत असल्याने शेतीशिवारात पिंजरा लावून बंदोबस्त करावा अशी मागणी माजी सरपंच किशोर ह्याळीज, भरत खैरनार, अनिल पातळपुरे, समाधान जाधव, तेजस खैरनार, दिलीप जाधव, हेमंत पातळपुरे आदि शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

टॅग्स :NashikLeopard