ZP Head of Center: केंद्रप्रमुख पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन | Call for applications for post of ZP Head of centre nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZP Nashik latest marathi news

ZP Head of Center: केंद्रप्रमुख पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ZP Head of Center : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत रिक्त केंद्रप्रमुखाबाबत आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा होऊन, ही पदे भरण्याचे आश्वासन मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले होते. (Call for applications for post of ZP Head of centre nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ या परिक्षेचे ऑनलाइन पद्धतीने जून २०२३ च्या अखेरच्या आठवड्यात आयोजन करण्यात येणार आहे.

त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन प्रणालीद्वारे ६ जून ते १५ जून या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदर परिक्षेचे माध्यम अभ्यासक्रम, पात्रता अर्ज करण्याची कार्यपद्धत व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.