Latest Marathi News | रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे महागडा कॅमेरा मिळाला परत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sub-inspector Suraj Medhe handed over the found camera to the original owner

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे महागडा कॅमेरा मिळाला परत!

येवला (जि. नाशिक) : एकीकडे लूटमार, फसवणूक आणि स्वार्थी जग झालेले दिसत असताना त्यातही आज प्रामाणिकपणा तितकाच टिकून असल्याचे दिसून येते..! लाखो रुपयांचा कॅमेरा सापडल्यानंतर येथील एका रिक्षावाल्याने हा महागडा कॅमेरा सामाजिक कार्यकर्त्यांच्या व पोलिसांच्या मदतीने सोशल मीडियाच्या मा ध्यमातून मूळ मालकाला परत केल्याने या रिक्षाचालकाचे तोंडभरून कौतुक होत आहे. (camera worth 2 half lakhs returned to its owner help of Social Media by rickshaw driver Nashik News)

शहर व तालुक्यात फोटोग्राफी व्यवसाय करणारा तरुण सागर माळी चिचोंडी येथे फोटोच्या शूटिंगचे काम संपवून येवल्यात परत येत असताना विंचूर चौफुली येथील रिक्षा स्टॅन्डशेजारील गतिरोधकावर त्याची मोटारसायकल उधळली.

या वेळी त्याच्या बॅगमधील तब्बल दोन लाख ६५ हजार रुपयांचा कॅमेरा रस्त्यावर पडला. मात्र ही बाब त्याच्या लक्षात आली नाही. तो तसाच पुढे निघून गेला. मात्र या ठिकाणी व्यवसाय करणारे रिक्षाचालक शंकर सातभाई, बाबासाहेब शिंदे या दोघांच्या काहीतरी पडल्याचे लक्षात आले.

त्यांनी तातडीने बॅग उचलली व त्यात कॅमेरा असल्याचे लक्षात येताच चौफुली येथील कार्यकर्ते सुदर्शन खिल्लारे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी कॅमेऱ्याचे छायाचित्र काढून सोशल मीडियावर योग्य त्या माहितीसह पोस्ट केली.

हेही वाचा: गणेशोत्सवात शहरातील वाहतूक मार्गातील बदल; जाणून घ्या

सहा वाजता हरवलेला कॅमेरा अवघ्या एक तासात सोशल मीडियाच्या पोस्टमुळे मूळ मालकाला शोधण्यात यश आले. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे आणि सोशल मीडियाचा योग्य वापर झाल्यामुळे महागडा कॅमेरा परत मिळाल्याचा आनंद फोटो व्यावसायिक सागर माळी यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.

कॅमेऱ्याची मूळ मालकाची ओळख पटवून शहर पोलिस स्टेशन ठाण्यात जाऊन उपनिरीक्षक सूरज मेढे यांच्या हस्ते तो परत केला. या वेळी फोटो व्यावसायिक मच्छिंद्र पल्ले, शंकर सातभाई, बाबासाहेब शिंदे, वाल्मीक गवळी, सूरज बोडखे, लक्ष्मण सातभाई, सचिन काळे, पोलिस शिपाई दळवी आदी उपस्थित होते. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे पोलिसांसह शहरातूनही कौतुक होत आहे.

हेही वाचा: Nashik : ऐन सणासुदीत कृत्रिम पाणीटंचाई

Web Title: Camera Worth 2 Half Lakhs Returned To Its Owner Help Of Social Media By Rickshaw Driver Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..