Accident News: नांदगाव-मालेगाव मार्गावर कार पुलावरुन कोसळली नदीत; लहान बाळासह 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर 5 जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Accident News: नांदगाव-मालेगाव मार्गावर कार पुलावरुन कोसळली नदीत; लहान बाळासह 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर 5 जण जखमी

नाशिकमधील नांदगावमध्ये कारचा भीषण अपघात झाला असून इको गाडी पुलावरून थेट नदीत कोसळली. या अपघातात एका लहान बाळासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नांदगावमधील नाग्यासाक्या धरणासमोरील नांदगाव मालेगाव राज्यमार्गावर ही भीषण घटना घडली आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. नदीवर कठडे नसलेल्या पुलावरुन गाडी थेट नदीत कोसळल्यामुळे तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अपघातात एका लहान बाळासह तिघांचा मृत्यू आहे, तर 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

या अपघातातील जखमी आणि मृतांबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.