Burning Truck : नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात बर्निंग ट्रकचा थरार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A cargo truck burnt down in the ghat

Burning Truck : नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात बर्निंग ट्रकचा थरार!

इगतपुरी (जि. नाशिक) : नाशिक मुंबई महामार्गावर (Highway) नवीन कसारा घाटात बुधवार (ता.१ रोजी) पहाटे 6.30 वाजेच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या मालट्रकने अचानक पेट घेतला. ( cargo truck heading towards Mumbai suddenly caught fire at Nashik Mumbai highway at new Kasara Ghat nashik news)

प्रसंगावधान राखत चालकाने ट्रक साइडला लावून आपला जीव वाचवला. घटनेची माहीती मिळताच महामार्ग पोलिस केंद्र घोटी, टोल प्लाझा अग्निशमन दल चे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

या ट्रकची बाहेरून आग आटोक्यात आणली मात्र आतून ट्रकने पुन्हा आग पकडली.या आगीत ट्रक जळून खाक झाला.त्यामुळे काहीकाळ नाशिक मुंबई वाहतूक विस्कळित झाली होती.