Jindal Fire Case : जिंदालमधील अग्निकांडप्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jindal Fire Accidnt

Jindal Fire Case : जिंदालमधील अग्निकांडप्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीला लागलेल्या आगीप्रकरणी सात जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नुकतीच या प्रकल्पाला भेट देऊन एवढ्या मोठ्या घटनेप्रकरणी अद्याप गुन्हा का दाखल झालेला नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला होता, त्यानंतर हालचाली होऊन वरीलप्रमाणे कार्यवाही झालेली आहे हे विशेष... (Case filed against 7 people in Jindal fire case nashik news)

आगीच्या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर करीत होते. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, नाशिक व संबधित विभागांशी पत्रव्यवहार करून अहवाल मागविण्यात आले होते. त्याचबरोबर कंपनीचे सेफ्टी ऑडिट रिपोर्ट व इतर कागदपत्रे प्राप्त करण्यात आली होती.

सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता, ज्या बॅच पॉलिफिल्म प्लँटमध्ये प्रथमतः आग लागली होती, तो बॅच पॉलिफिल्म प्लँट सुमारे दीड महिन्यापासून बंद होता. हा प्लँट सुरू करण्यापूर्वी त्याची तपासणी व दुरुस्ती होऊन, तो सुरू करताना SOP चे पालन न केल्याने प्लँटमधून थर्मिक फ्लुईड ऑइलची गळती होऊन मोठा स्फोट होऊन आग लागल्याचे निष्पन्न झाले आहे.

श्री. दानवे यांनी कंपनी कितीही मोठी असली तरी गुन्हा दाखल होणारच, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर धावाधाव करीत गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

या आगीत एक पुरुष व दोन महिला कामगारांचा मृत्यू व कंपनीच्या इतर २२ कामगारांच्या दुखापतीस जिंदाल पॉलिफिल्म प्रा. लि. कंपनीचे भोगवटादार, फॅक्टरी मॅनेजर, पॉलिफिल्म प्लँट बिझनेस हेड, प्रोडक्शन मॅनेजर, मेन्टेन्सस विभागप्रमुख, प्रोडक्शन डिपार्टमेंट शिफ्ट इन्चार्ज आणि प्लँट ऑपरेटर या सात जणांना जबाबदार धरण्यात आले असून, त्यांच्याविरोधात घोटीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार घोटी पोलिस ठाण्यात कलम ३०४ (अ), ३३७, ३३८, २८५, २८७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले करीत आहेत.

टॅग्स :NashikFire Accident