Nashik Crime News : सायकलस्वाराच्या मृत्यू प्रकरणी 6 महिन्यानंतर गुन्हा दाखल

Crime News
Crime News esakal

नाशिक : पखाल रोडवरील विद्युत खांबाची दुरुस्ती करताना त्यात आवश्यक उपाययोजना न केल्याने विद्युत प्रवाह पावसाच्या पाण्यात उतरून एक सायकलस्वार गतप्राण झाला होता.

याप्रकरणी अखेर सहा महिन्यांनंतर खासगी कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजर व अभियंत्यावर सायकलस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा मुंबई नाका पोलिसांनी दाखल केला आहे. (case has been registered in death of cyclist after 6 months Nashik Crime News)

बबलू वकील खान (२३, रा. जुने नाशिक) असे मृत सायकलस्वाराचे नाव असून तो बेकरी कामगार होता. रत्नाकर कृष्णदेव मिश्रा (रा. पाथर्डी फाटा, नाशिक), विशाल देविदास गायखे, (रा. उत्तरानगर, तपोवन रोड) व नीलेश गिरिधर कुंवर( रा. तोरणानगर, सिडको) अशी संशयितांची नावे आहेत.

८ सप्टेंबर २०२२ ला बबलू हा सायकलवरून काझी कब्रस्तान समोरील पावसाच्या साचलेल्या पाण्यातून पुढे जात असताना पाण्यात विद्युत प्रवाह उतरून त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास केला.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

Crime News
Jalgaon Crime News : बकऱ्या चोरणाऱ्या महिला गँगला अटक

त्यात नाशिक महापालिकेच्या स्ट्रीट वीजखांब नं. एनई १५ जीएससी २-४५ ची देखभाल व दुरुस्ती करणारे टाटा प्रोजेक्ट कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर रत्नाकर मिश्रा व इंजिनिअर विशाल गायखे तसेच ठेकेदार नंदिनी एंटरप्रायझेसचे नीलेश कुंवर यांनी हयगय व निष्काळजीपणा दाखविला.

सुरक्षितताकरीता ईएलसीबी व एमसीबी न बसविल्याने या खांबाच्या तारेमध्ये शॉर्टसर्किट झाला व विद्युत प्रवाह पाण्यात उतरून नाहक बबलू खानला शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार भगवान भोये यांनी फिर्याद दिली असून, तपास उपनिरीक्षक संदीप पाटील तपास करत आहेत.

Crime News
Crime : सहायक पोलिस निरीक्षक लाच स्वीकारताना जाळ्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com