Nashik Crime News : सातपूर गोळीबार प्रकरणी 5 संशयितांवर गुन्हा दाखल

Crime news
Crime newsesakal

सातपूर (जि. नाशिक) : महिंद्रा सोना व ईपिराक कंपनीच्या गेटसमोर रविवारी (ता. १९) दुपारी सिनेस्टाइलने गाडीचा पाठलाग करून तपन जाधव व राहुल पवार यांच्यावर कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार करीत जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी राहुल पवार यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिस ठाण्यात सुमारे पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case registered against 5 suspects in Satpur firing case Nashik Crime News)

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

Crime news
Crime News : धक्कादायक! मध्यरात्री स्वतःलाच श्रद्धांजली वाहून युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

सोमवारी (ता. २०) दिवसभर फरारी संशयितांच्या शोधासाठी यंत्रणा व्यस्त होती. गोळीबारामुळे पुन्हा एकदा अवैद्य हत्यारांचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. पोलिसांनी मुळापर्यंत पाळेमुळे शोधण्याची मागणी होत आहे.

भाईगिरीची क्रेझ व कमी काळात श्रीमंत होण्याच्या नादात औद्योगिक व कामगार नगरीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, दहा दिवसांपूर्वी अचानक बदली झालेले महेंद्र चव्हाण यांना गोळीबार प्रकरणी पुन्हा सातपूर पोलिस ठाण्याचा कारभार सोपविण्यात आला आहे.

चव्हाण यांच्यावर पुन्हा दाखविलेला विश्वास सार्थ ठरवता का, हाच खरा सवाल नागरिक उपस्थित करत आहे. घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे.

Crime news
Jalgaon Crime News: खिडकी तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश अन् कपाट तोडून दागिने लंपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com