Nashik News : अखेर 7 उंट मालकांविरुद्ध गुन्हा दाखल

Case registered against 7 camel owners nashik news
Case registered against 7 camel owners nashik newsesakal

Nashik News : दिंडोरी- नाशिक रस्त्यावरून २९ उंटाचा कळप नाशिक येथे गुरुवार (ता.४) रोजी जात असताना पोलिसांनी कळपातील उटांचे मालक असलेल्या एका महिलेसह सात जणांची दिंडोरी पोलिसांनी चौकशी करीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उंटाची वैद्यकीय तपासणी करून घेतली. (Case registered against 7 camel owners nashik news)

दरम्यान वैद्यकीय अहवालावरून पोलिसांनी उंट मालकांवर प्राण्यांना निर्दयपणे वागविण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वणी- नाशिक रस्त्यावरून २९ उंटांचा जथ्था हा गुरुवार (ता.४) रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास सिडफार्म दिंडोरी शिवार (ता. दिंडोरी) येथून नाशिककडे जात असताना पोलिसांनी सदर जथ्था थांबवून पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना (दिंडोरी) यांना लेखी पत्र देवून सदर २९ उंटांची वैद्यकीय तपासणीबाबत विनंती केली. त्यानुसार उंटांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Case registered against 7 camel owners nashik news
Chhagan Bhujbal : शरद पवार यांच्या राजीनाम्याची अजित पवारांना पूर्वकल्पना : छगन भुजबळ

वैद्यकीय तपासणी अहवाल डॉ. राहुल कौठाळे यांच्याकडून पोलिसांना प्राप्त झाला. त्यात जथ्थामधील उंट हे तहानलेले व अशक्त असल्याचे तसेच त्यांना चालविल्याने उंटांच्या पायांना जखमा झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्रात नमूद करण्यात आल्याने सदरचा प्रकार हा प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा अधिनियमांतर्गत येत असल्याने

अस्लम रफिक सय्यद (रा. औरंगाबाद नाका, नाशिक), गुटिया अब्दुल सय्यद (रा. औरंगाबाद नाका, नाशिक), शाहरुख मेहताब सय्यद (रा.पंचवटी नाशिक), दीपक मेहताब सय्यद (रा. पंचवटी, नाशिक), समीर गुलाब सय्यद (रा. जालना), एजास गुलाब सय्यद (रा.जालना), शाहजूर मिसऱ्या सय्यद (रा.जालना) या उंटांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Case registered against 7 camel owners nashik news
Nashik News : नाशिकमध्ये रोखला उंटांचा ताफा; तस्करीचा संशय, 2 उंटाचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com