Latest Crime News | डॉ. प्राची पवार यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Prachee Pawar

Nashik Crime News : डॉ. प्राची पवार यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नाशिक : नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्राची पवार यांच्यावर मंगळवारी (ता. १३) रात्री झालेल्या हल्ल्याप्रकरणी नाशिक तालुक पोलिसात अज्ञात तिघांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुन्या वादातून झाल्याची चर्चा आहे. डॉ. प्राची पवार या दिवंगत खासदार वसंत पवार व मविप्रच्या माजी सरचिटणीस निलिमा पवार यांच्या कन्या आहेत. (case registered in connection with attack on dr Prachi Pawar Nashik Latest Crime News)

डॉ. प्राची पवार यांच्यावर सुश्रुत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉ. पवार यांच्या फिर्यादीनुसार, गंगापूर रोडवरील गोवर्धन शिवारात त्यांचे फार्म हाऊस आहे. मंगळवारी (ता. १३) रात्री साडेआठच्या सुमारास त्या दुचाकीवरून त्यांच्या फार्म हाऊसजवळ पोहोचल्या असता, गेटजवळ अज्ञात तिघांनी दुचाकी आडवी लावलेली होती. डॉ. पवार यांनी संशयित तिघांना हटकले असता, त्यांनी डॉ. पवार यांच्यावर कोयत्याने वार केले. यात त्याच्या हाताला आणि खांद्यावर गंभीर दुखापत झाली आहे.

संशयितांनी वार केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. डॉ. पवार यांनी आरडाओरडा केल्यानंतर आसपासचे नागरिक व फार्म हाऊसमधील माणसे मदतीला धावून आले. तोपर्यंत संशयित पसार झाले. त्यांना तात्काळ पंडित कॉलनीतील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी बुधवारी (ता. १४) अज्ञात तिघा संशयितांविरोधात नाशिक तालुका पोलिस ठाण्यातप्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Nashik News : जुनाट खेळण्या मुलांसाठी हानिकारक; सिडको बाल उद्यानाची दयनीय अवस्था!

या हल्ल्याप्रकरणी शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. संशयित तरुणाचे वडील हे पवार यांच्या फार्म हाऊसमध्ये कामाला आहे. त्यांना काही कामासंदर्भात डॉ. पवार यांनी रागिवले होते, त्यावरून संशयित तरुणाने हल्ला केल्याचे बोलले जाते. यासंदर्भात संशयितांच्या अटकेनंतर खरे कारण समोर येणार आहे. नाशिक तालुका व स्थानिक गुन्हेशाखेचे पथक संशयितांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा: Nashik News : त्रस्त कंत्राटदार संघर्षाच्या पवित्र्यात; महापालिका आयुक्तांना अडवणुकीबाबत साकडे