Nashik Crime News : पत्रकारांना मारहाण प्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल

Pune Crime
Pune Crimeesakal

Nashik Crime News : शहरातील ठक्कर डोम येथे नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या लावणीच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांनी प्रसार माध्यमांच्या दोन प्रतिनिधींना बेदम मारहाण केली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मारहाण, पत्रकार संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी कार्यक्रम स्थळावरील फुटेजच्या आधारे पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. (case registered in Gangapur police in case of beating journalists Nashik Crime News)

प्रसार माध्यमाचे कॅमेरामन आकाश येवले यांच्या फिर्यादीनुसार मंगळवारी (ता. १६) त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथे नवनिर्माण सेवाभावी संस्थेतर्फे नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. यासाठी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधीही वृत्त संकलनासाठी उपस्थित होते. या वेळी येवले हे कार्यक्रमाचे शूटिंग करत असताना २० ते २५ वयोगटातील पाच ते सहा अज्ञात संशयितांनी अचानक हल्ला चढविला.

या हल्लेखोरांनी येवले यांच्यासह कॅमेरामन अशोक गवळी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात त्यांच्याकडील कॅमेऱ्याचेही नुकसान झाले आहे. जखमी दोघांना पत्रकारांना तत्काळ सुयश हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती कळताच गंगापूरचे पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेत माहिती घेतली आणि कार्यक्रम स्थळावरील फुटेजच्या आधारे पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख हे करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Pune Crime
Jalgaon Bribe Crime : बांबरुड तलाठी कार्यालयात लाच घेताना ‘पंटर’ला अटक

दरम्यान, कार्यक्रमाचे आयोजन करताना कार्यक्रमस्थळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नेमण्याची व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेण्याबाबत सूचना पोलिस यंत्रणेने दिल्या होत्या. आयोजकांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यामुळे गंगापूर पोलिसात त्यांच्याही विरोधात भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाबंदीची राष्ट्रवादीची मागणी

गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाप्रसंगी मद्यपी संशयितांकडून पत्रकारांना मारहाण करण्यात आल्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे.

तसेच, पाटील यांच्या कार्यक्रमात असे अनुचित प्रकार घडत असल्याने गौतमी पाटील यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करून पाटील यांना जिल्हाबंदी करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पोलिस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Pune Crime
Nagpur Crime : भिवापुरात पेट्रोल पंप मालकाचा भरदिवसा खून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com