Nashik Crime News : म्हसरूळ परिसरात मंगळसूत्र खेचले

chain snatching latest crime news
chain snatching latest crime newsesakal

नाशिक : कचरा टाकून घरी परतणाऱ्या महिलेचे ४० हजारांचे मंगळसूत्र खेचून पळवण्याची घटना म्हसरूळला ओमकारनगर भागात घडली. महिलेने आरडाओरड केल्याने चोरट्यांच्या हाती मंगळसूत्राचा अर्धाच भाग लागला. (chain snatching of women in Mhasrul area Nashik Crime News)

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

chain snatching latest crime news
Crime cases : मुस्लिम असतानाही हिंदू असल्याचे भासवून केली महिलेची विक्री

हेमलता सुभाष बधान (वय ५१, रा. जोगेश्‍वरी रो हाउस, ओंमकारनगर) रविवारी (ता. २६) सायंकाळी साडेआठला कचरा टाकून घरी परतत होत्या. या वेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने श्रीमती बधान यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले.

क्षणार्धात घडलेल्या या घटनेमुळे भांबावलेल्या सौ. बधान यांनी आरडाओरडा करताच चोरट्यांनी हाती आलेला मंगळसूत्राचा अर्धा तुकडा घेऊन पळ काढला. म्हसरूळ पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला असून, सहायक निरीक्षक आहिरे तपास करत आहेत.

chain snatching latest crime news
Nashik Crime News : चोरट्याकडून 12 मोबाईल हस्तगत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com