esakal | पावसाचे बदललेले वेळापत्रक.. दिवस झाले कमी 
sakal

बोलून बातमी शोधा

nashik rain 1.jpg

दुष्काळाच्या मूल्यांकनासाठी सरासरी पर्जन्याची आकडेवारी वापरण्यात येणार आहे. याशिवाय यंत्रणांकडून पैसेवारी, टंचाईसह आपत्कालीन पीकस्थितीसाठी या सरासरी पर्जन्यमानाचा उपयोग केला जाईल. यापूर्वी राज्यातील तालुक्‍यांचे पर्जन्यमान निश्‍चित करण्यात आले होते. त्यास 14 वर्षांचा कालावधी झाला होता. त्यामुळे राज्यातील जिल्हा आणि तालुकानिहाय महिन्यानुसार सरासरी पर्जन्यमान निश्‍चित करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले होते.

पावसाचे बदललेले वेळापत्रक.. दिवस झाले कमी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. पावसाचे दिवस कमी झाले आहेत. त्याच वेळी तीन आठवडे पाऊस पुढे गेला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावणाऱ्या पावसाची जुलैमध्ये प्रतीक्षा करावी लागते. याच पार्श्‍वभूमीवर पुण्याच्या भारत हवामान विभागातर्फे 1961 ते 2010 मधील तालुकानिहाय दररोजच्या पावसाचा विचार करून सरासरी पर्जन्यमान निश्‍चित केले आहे. राज्यातील जिल्हा आणि तालुकानिहाय ही निश्‍चित केलेली पर्जन्याची आकडेवारी आहे. 

दुष्काळ, पैसेवारी, टंचाईसह आपत्कालीन पीकस्थितीसाठी होणार वापर 

दुष्काळाच्या मूल्यांकनासाठी सरासरी पर्जन्याची आकडेवारी वापरण्यात येणार आहे. याशिवाय यंत्रणांकडून पैसेवारी, टंचाईसह आपत्कालीन पीकस्थितीसाठी या सरासरी पर्जन्यमानाचा उपयोग केला जाईल. यापूर्वी राज्यातील तालुक्‍यांचे पर्जन्यमान निश्‍चित करण्यात आले होते. त्यास 14 वर्षांचा कालावधी झाला होता. त्यामुळे राज्यातील जिल्हा आणि तालुकानिहाय महिन्यानुसार सरासरी पर्जन्यमान निश्‍चित करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले होते. दर वर्षी पावसाळ्यात सरकार तयार करत असलेले आणि विभागीय आयुक्तांकडे सादर होणारे पर्जन्यमानाचे अहवाल सरासरी पर्जन्यमानाच्या आधारे तयार केले जातात. ही आकडेवारी 2006 मधील होती. त्यानंतर पावसाच्या हजेरीमध्ये झालेल्या बदलाचा फायदा मात्र संबंधित तालुक्‍यांना होत नव्हता. त्यावर उपाय म्हणून तालुका आणि जिल्हानिहाय जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत प्रत्येक महिन्याचे सरासरी पर्जन्यमान निश्‍चित करण्यात आले आहे. 

राज्याचे वार्षिक पर्जन्यमान 
राज्याचे सुधारित वार्षिक पर्जन्यमान 1140.30 मिलिमीटर इतके असेल. महिनानिहाय राज्याचे सरासरी पर्जन्यमान मिलिमीटरमध्ये असे ः जानेवारी- 4.80, फेब्रुवारी- 3.50, मार्च- 5.70, एप्रिल- 6.10, मे- 17.70, जून- 207.60, जुलै- 330.90, ऑगस्ट- 286, सप्टेंबर- 179.70, ऑक्‍टोबर- 71.10, नोव्हेंबर- 20, डिसेंबर- 7.30. 

हेही वाचा > ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या 'त्या' फोटोमागचे सत्य समजले.. तर तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

जिल्हानिहाय पर्जन्यमान 
(आकडे मिलिमीटरमध्ये) 

जिल्हा वार्षिक पर्जन्यमान जिल्हा वार्षिक पर्जन्यमान 
ठाणे 2530.20 रायगड 3303.30 
रत्नागिरी 3394.90 सिंधुदुर्ग 3182.90 
पालघर 2396.20 नाशिक 1043.70 
धुळे 608.40 नंदुरबार 916.60 
जळगाव 719.70 नगर 574.50 
पुणे 1001 सोलापूर 647 
सातारा 1071.70 सांगली 721.80 
कोल्हापूर 1963.60 औरंगाबाद 697 
जालना 721.70 बीड 699.30 
लातूर 860.90 उस्मानाबाद 760.30 
नांदेड 947.40 परभणी 903.30 
हिंगोली 923.60 बुलडाणा 760.40 
अकोला 803.80 वाशिम 900.20 
अमरावती 972.30 यवतमाळ 926.80 
वर्धा 1013 नागपूर 1060.30 
भंडारा 1298.50 गोंदिया 1352.50 
चंद्रपूर 1223.50 गडचिरोली 1397.40 

हेही वाचा > मालेगावकरांनो..आकडा वाढत असला तरी दिलासादायक 'घटना'ही घडताहेत बरं का!
 

loading image