Nashik News: जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रभारी आयुक्तपदाचा कार्यभार; शिक्षण प्रशासनाधिकारीपदी डॉ. मिता चौधरी | Charge of In charge Commissioner to District Collector Education Administrative Officer Dr Mita Chaudhary Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC Latest News

Nashik News: जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रभारी आयुक्तपदाचा कार्यभार; शिक्षण प्रशासनाधिकारीपदी डॉ. मिता चौधरी

Nashik News : महापालिकेचे प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे आठ दिवसांच्या रजेवर गेल्याने त्यांच्याकडील प्रभारी आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे आला आहे. (Charge of In charge Commissioner to District Collector Education Administrative Officer Dr Mita Chaudhary Nashik News)

महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे मसुरी येथे प्रशिक्षणाला गेले होते. प्रशिक्षण कालावधीतील त्यांचा कार्यभार विभागीय आयुक्त श्री. गमे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

त्यानंतर डॉ. पुलकुंडवार प्रशिक्षण संपवून परतत असतानाच त्यांची राज्याच्या साखर आयुक्तपदी बदली झाली. त्यामुळे गमे यांच्याकडेच आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार आहे. गमे हे गुरूवार (ता. ८)पासून रजेवर जात आहेत.

त्यामुळे आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार आता जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. शासनाच्या नगरविकास विभागाने तसे आदेश दिले. जिल्हाधिकारीसुद्धा आठ दिवसांपासून रजेवर होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनिता धनगर यांना लाच प्रकरणात अटक झाल्याने त्यांच्या जागेवर नाशिक पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. मिता चौधरी यांची प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली.

आयुक्तपदाचा सस्पेन्स कायम

महापालिका आयुक्तपदाचा सस्पेन्स आजही कायम राहीला. नवी मुंबईच्या आयुक्तांची नाशिकला बदली झाल्याची अफवा पसरली. दरम्यान नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, फिल्मसिटीचे संचालक डॉ. अविनाश ढाकणे, नंदुरबार जिल्हा परिषदेचे सीईओ रघुनाथ गावडे, राज्याचे ईएसआय आयुक्त अशोक करंजकर, सोलापूरचे सीईओ दिलीप स्वामी यांच्या नावांची चर्चा आहे.

टॅग्स :NashikDistrict Collector