Chhagan Bhujbal : शिवसेना नाव आणि निशाणीविषयक निर्णय आश्‍चर्यकारक : छगन भुजबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : शिवसेना नाव आणि निशाणीविषयक निर्णय आश्‍चर्यकारक : छगन भुजबळ

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाचा निर्णय आश्‍चर्यकारक आहे, अशा शब्दांमध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केली. (Chhagan Bhujbal statement about election commission decision about shiv sena symbol nashik news)

तसेच लोकशाहीमध्ये विश्‍वास कुणावर ठेवायचा असा प्रश्‍न उपस्थित करत श्री. भुजबळ यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे लोकशाहीमध्ये विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकेल, अशी शंका उपस्थित केली. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. वेगवेगळ्या घटनाक्रमासंबंधी विचार सुरू आहे. कोण बरोबर, कोण चुकले याचा निकाल येईल, असे सांगून श्री. भुजबळ यांनी निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय पाहता, उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रतिज्ञापत्र मागण्याची गरज नव्हती.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

श्री. भुजबळ म्हणाले, की देशातील यंत्रणा स्वतंत्र असल्या, तरी सरकारच्या दबावाखाली आहेत, असा प्रचार सुरु आहे. आजचा निर्णय होईल, असे लोकांना कळले होते. त्यामुळे पक्षाचे नाव, निशाणी कुणाला मिळाली, तरीही सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळेल, असा दावा श्री. भुजबळ यांनी केला.