Chhagan Bhujbal : वाघ, बाळासाहेब अन् मराठी माणसाची शिवसेना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

then Shiv Sena leader Chhagan Bhujbal looking at the photo album of Shiv Sena meetings 40 years ago.

Chhagan Bhujbal : वाघ, बाळासाहेब अन् मराठी माणसाची शिवसेना!

येवला (जि. नाशिक) : १९८३ चा तो काळ.., आम्ही महाराष्ट्रभर फिरत होतो, कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने जमायचे..,वाघाचे चित्र,बाळासाहेब आणि शिवसेना नावाच्या फलकाचे आम्ही उद्घाटन करायचो आणि शाखा सुरू व्हायची...! मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हितासाठी स्थापन झालेली शिवसेना (Shivsena) त्यावेळी चळवळ झाली होती...! (Chhagan Bhujbal tells memories of events of starting first branch of Shiv Sena in Yeola nashik news)

तब्बल ४० वर्षांपूर्वीच्या या आठवणी सांगितल्या, त्या माजी उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे पहिले आमदार छगन भुजबळ यांनी..., या आठवणींना उजाळा देण्यासाठी निमित्त ठरले, ते शिवसेनेचे तत्कालीन नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते ५ मार्च १९८३ मध्ये येवला शहरात पहिली शिवसेनेची शाखा सुरू केली त्या घटनेच्या आठवणींचे..!

शाखा स्थापनेला आज चाळीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहरातील शिवसेनेचे नेते किशोर सोनवणे यांच्यासह जुन्या शिवसैनिकांनी येथील संपर्क कार्यालयात छगन भुजबळ यांची रविवारी (ता. ५) भेट घेतली. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत भुजबळ यांनी शिवसैनिकांना ‘जय महाराष्ट्र’ केला.

जुने शिवसैनिक किशोर सोनवणे यांच्यासह शिवसैनिकांनी रविवारी भुजबळ यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी जुन्या छायाचित्रांचा अल्बम भुजबळ यांना दाखविला. जुने फोटो बघताच भुजबळ यांनी येवल्यातील सभा स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. दादा कोंडके इतर नेत्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

यावेळी उपस्थित शिवसैनिकांसमवेत जुन्या आठवणींच्या गप्पांमध्ये भुजबळ व कार्यकर्ते रममान झाल्याचे बघावयास मिळाले. शिवसेना शाखा स्थापनेबाबत जुन्या कार्यकर्त्यांची त्यांनी आस्थेने चौकशी केली. शिवसैनिक किशोर सोनवणे, बाजीराव भोर, चंद्रमोहन मोरे, गणेश सोनवणे, अर्जुन मोडसे, भागीनाथ थोरात यांनी भेट घेत भुजबळ यांचा सन्मान केला.

जुन्या आठवणींना दिला उजाळा

याविषयी पत्रकारांशी चर्चा करताना भुजबळांनी त्या वेळच्या शिवसेनेच्या आठवणी सांगितल्या. स्वतः बाळासाहेबांनी ‘मार्मिक’मधून जनमाणसात मराठी माणसाला न्याय मिळावा ही भूमिका मानली होती, त्यातूनच शिवसेनेचा उदय झाला.

प्रारंभी केंद्रीय कंपन्यात अनेक मराठी माणसे असल्याने मराठी माणूस प्राधान्याने घ्यायला पाहिजे ही भूमिका मांडल्याने तेव्हापासून अनेक मराठी माणसे बाहेरील कंपन्यात दिसू लागले शिवसेने स्थापनेनंतर आम्ही राज्यभर शाखा उद्‍घाटन करत फिरत होतो आणि शिवसेनेला त्यावेळी प्रतिसादही भरभरून मिळत असल्याची आठवण भुजबळ यांनी सांगितली.