Nashik News : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे कळवणला आज अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhatrapati Shivaji Maharaj Statue File Photo

Nashik News : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे कळवणला आज अनावरण

कळवण (जि. नाशिक) : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण आज (शुक्रवार ता.१०) दुपारी ४ वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत असल्याची माहिती कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांनी दिली.

या निमित्ताने सर्व शहर भगवेमय झालेले आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj statue unveiled today Presence of Sharad Pawar Sambhaji Raje Chhatrapati Nashik News)

शहरातील शिवतीर्थ येथे कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांच्या संकल्पनेतून लोकसहभागातून छ्त्रपती शिवाजी महाराजांचा उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच अश्वारुढ पुतळा दिल्ली येथील शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांनी साकारला आहे.

गेल्या ४ मार्च पासून शिवतीर्थ व गांधी चौकात विविध धार्मिक व शिवचरित्रावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आज होत असलेल्या अनावरण सोहळ्यानिमित्त दुपारी दोनला वाजता शिवशाहीर कार्यक्रम (पोवाडा), दुपारी चारला पुतळा अनावरण तर सायंकाळी ६ला लेझर लाइट आणि फायर शोचे आयोजन करण्यात आले आहे

या कार्यक्रमासाठी पद्मभूषण राम सुतार, पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, हभप संजय धोंडगे, प्रा.यशवंत गोसावी आदींसह मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यक्रमास तालुक्यातील आणि परिसरातील शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार नितीन पवार, नगराध्यक्ष कौतिक पगार,शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांनी केले आहे.
---------

पुतळ्याची वैशिष्ट्ये
- उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा
- पुतळ्याची उंची २१ फूट
- पुतळ्याची लांबी १७ फूट
- पुतळ्याचे वजन - ७ टन
Remarks :
Kalwan१


Audit History:

Date/TimeDescriptionActionBy3/9/2023 6:16:24 PMStory received from B-KALWANravindra.pagar3/9/2023 6:44:32 PMStory Editedskunal3/9/2023 6:45:15 PMStory marked as Proofedskunal3/9/2023 6:45:18 PMStory marked as Ready