Nashik: किसान लॉंग मार्च मधील मृत्यु पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयास मुख्यमंत्र्याकडून 5 लाखाची मदत सुपूर्त

Late Farmer Pundlik Ambu Jadhav
Late Farmer Pundlik Ambu Jadhavesakal

Nashik News : माकप व किसान सभेच्यावतीने दिंडोरी येथून निघालेल्या शेतकरी लॉन्ग मार्चमधील मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मदत म्हणून पाच लाख रुपयांचा धनादेश आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला आहे. (Chief Minister grants 5 lakh aid to family of farmers who died in Kisan Long March Nashik news)

माकप व किसान सभेने ११ मार्च २०२३ रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, वन जमिनीसाठी दिंडोरी येथून मुंबईला लाँग मार्च काढला होता. दिंडोरी येथून हे लाल वादळ मुंबईच्या दिशेने निघून तब्बल सात दिवसांच्या प्रवासानंतर शेतकरी लॉन्ग मार्च शहापूरपर्यंत पोहचला होता.

या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ आणि लॉन्ग मार्चमधील नेतृत्वाची बैठक झाली होती. याच दरम्यान मोर्चात सहभागी असलेले दिंडोरी तालुक्यातील मावडी येथील शेतकरी पुंडलिक अंबु जाधव, वय ५८ यांना वाशिंदमध्ये अस्वस्थ वाटू लागल्याने मोर्चेकऱ्यांनी त्यांना तातडीने शहापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर मोर्चेकरी व गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. आमच्या मागण्या अगोदरच मान्य केल्या असत्या आणि त्याची अंमलबजावणी केली असती तर ही वेळ आली नसती अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या होत्या.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Late Farmer Pundlik Ambu Jadhav
Nashik News: संकटांवर मात करत शेतकरी लागले कामाला; कसबेसुकेणेत द्राक्षबागांत एप्रिल खरड छाटणीस सुरवात

तसेच आमचा शेतकरी बांधवाचा मृत्यू झाला, त्याला शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी देखील माडी येथील गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी केली आहे. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांची मदत दिली जाईल, अशी माहिती दादा भुसे यांच्यावतीने दिली होती..

दरम्यान आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी दादर या ठिकाणी भेट देवून अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत उपस्थित शेतकरी लॉन्ग मार्च मध्ये निधन झालेल्या शेतकऱ्याची पत्नी बेबी जाधव व मुलगा गणेश जाधव यांना पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

यावेळी दिंडोरीचे तहसिलदार पंकज पवार त्यांच्या समवेत होते. तसेच लाँग मार्चमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना त्यांना घरा पर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हाधिकारी व दिंडोरीचे तहसिलदार व प्रशासन यांनी विशेष सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे कौतूक मुख्यमंत्र्यांनी केले.

Late Farmer Pundlik Ambu Jadhav
Unseasonal Rain Nashik : ढगाळ वातावरणाचा शेतकऱ्यांनी घेतला धसका; अवकाळीची अवकळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com