esakal | मुख्यमंत्र्यांकडून येवल्यातील व्यापाऱ्याचे तोंडभरुन कौतुक; जगावेगळ्या कामाचा सुगंध थेट ‘मातोश्री’वर
sakal

बोलून बातमी शोधा

paithani.jpg

शासनस्तरावरून हातमाग विणकराना प्रोत्साहन देण्यासाठी नक्कीच ठोस पावले उचलली जातील, असेही ठाकरे यांनी सांगितले. पैठणीची इत्यंभूत माहिती घेताना तुम्ही सर्व काही विणले. परंतु, आता पैठणीत शिवमुद्राचे विणकाम करा, अशी अपेक्षाही ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केली. 

मुख्यमंत्र्यांकडून येवल्यातील व्यापाऱ्याचे तोंडभरुन कौतुक; जगावेगळ्या कामाचा सुगंध थेट ‘मातोश्री’वर

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (नाशिक) : ज्यांना कोणी आधार देत नाही, त्या दिव्यांगांना आपल्या छत्रछायेखाली घेत राहणे-खाण्याची सोय तर केलीच, पण पैठणी विणकामाचे धडे देऊन त्यांच्या हाताला रोजगारही उपलब्ध करून दिला आहे, तो येथील कापसे पैठणी व कापसे फाउंडेशन यांनी. याच जगावेगळ्या सामाजिक कामाचा सुगंध थेट ‘मातोश्री’वर पोचला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कापसे पैठणीचे सर्वेसर्वा बाळासाहेब कापसे यांना बोलवत त्यांच्या कार्याकवर शब्दसुमने उधळत कौतुक केले. 

कापसेंवर मुख्यमंत्र्यांकडून शब्दसुमने 

पैठणीच्या दुकानात काम करता करता येथील बाळकृष्ण कापसे आणि दिलीपदाजी खोकले यांनी या महावस्त्राच्या विणकाम व विक्रीचे पहिले मराठी दालन येथे सुरू केले आणि अख्ख्या महाराष्ट्राने त्यांना काही वर्षातच डोक्यावर घेतले. या प्रगतीसोबत त्यांनी कापसे फाउंडेशन स्थापन करून सामाजिक योगदानाची नेहमीच बांधिलकी बाळगली आहे. सध्या ३६ दिव्यांग पैठणी विणकर याठिकाणी या देखण्या महावस्राराला हातमागावर आकार देत आहेत. या कामाची माहिती शिवसेनेचे नेते नेते संजय राऊत यांना मिळताच राऊत यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत माहिती दिली आणि आज चक्क ‘मातोश्री’वर ठाकरे आणि बाळासाहेब कापसे यांची भेट झाली. या वेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. 

पैठणीत शिवमुद्राचे विणकाम करा...

ठाकरे पिता-पुत्रांचा येवल्याचा विशेष पैठणी शेला देऊन त्यांनी सत्कार केला. त्यांच्यासोबत मुलगी नुपूर व गोपाळ कापसे उपस्थित होते. या वेळी बाळासाहेबांच्या दिव्यांगांच्या सामाजिक बांधिलकीचे मुख्यमंत्र्यांनी तोंडभरून कौतुक केले. गरिबीच्या परिस्थितीतून मोठे होताना समाजाप्रति जपलेली संवेदना कौतुकास्पद असल्याचे ठाकरे म्हणाले. कोरोनानंतर पैठणी व्यवसाय आणि विणकरांचे सर्व काही सुरळीत झाले का, अशी आस्थेने विचारपूस करताना शासनस्तरावरून हातमाग विणकराना प्रोत्साहन देण्यासाठी नक्कीच ठोस पावले उचलली जातील, असेही ठाकरे यांनी सांगितले. पैठणीची इत्यंभूत माहिती घेताना तुम्ही सर्व काही विणले. परंतु, आता पैठणीत शिवमुद्राचे विणकाम करा, अशी अपेक्षाही ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केली. 

हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला

येवल्याच्या महावस्त्रला सातासमुद्रापलीकडे घेऊन जाताना गरजू दिव्यागांना आधार देण्यासाठी आम्ही प्रशिक्षण केंद्र सुरू केले असून, याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. मराठमोळ्या पैठणीला देखणेपण देणाऱ्या विणकरांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. मुख्यमंत्र्यांच्या या कौतुकामुळे नक्कीच विणकरांच्या कलेला अन्‌ आमच्या सामाजिक कामाला अजूनच बळ मिळेल. - बाळासाहेब कापसे, संचालक, कापसे पैठणी, येवला  

हेही वाचा >  निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड 

loading image