नाशिक शहरात नाताळचा जल्‍लोष | Christmas

Christmas
Christmasesakal

नाशिक : कोरोना (Corona) महामारीच्‍या सावटाखाली नाताळचा (Christmas) जल्लोष करताना ख्रिस्‍ती बांधवांनी सावधगिरी बाळगली. शुक्रवारी (ता. २४) रात्री उशीरा चर्चमध्ये झालेल्‍या प्रार्थनेत (मिसा) समाज बांधवांनी सहभाग नोंदविला. भारतासह जगाला लवकरात लवकर कोरोनाच्‍या संकटातून मुक्‍त करण्यासाठी प्रभू येशूकडे या वेळी साकडे घालण्यात आले. सावधगिरी म्हणून हस्तांदोलन, गळाभेट टाळत एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.

नाताळानिमित्त चर्च व परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तसेच चर्चच्‍या आवारात गोठा व यशू जन्‍माचा देखावा साकारण्यात आला आहे. त्र्यंबक नाका परिसरातील हॉलीक्रॉस चर्चमध्ये (Holy Cross Church) शुक्रवारी रात्री उशीरा प्रार्थना (मिस्सा) झाली. तत्‍पूर्वी उपस्‍थित भाविकांनी नाताळ गाणी म्‍हणत प्रभू यशू जन्‍माचा आनंद साजरा केला. या वेळी फादर विनायक कांटेला यांनी प्रार्थनेचे नेतृत्व केले. फादर वेन्सी डिमेलो यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रार्थना (मिसा) झाली. प्रार्थनागृहात मर्यादित स्वरूपात प्रवेश देताना कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यात आला, तसेच उपस्थित भाविकांना मास्कचा वापर बंधनकारक केला होता.
शरणपूर रोडवरील संत आंद्रिया चर्च, कॉलेज रोडवरील डॉन बॉस्‍कोच्‍या आवारातील चर्चमध्ये समाज बांधवांची उपस्‍थिती राहिली.

Christmas
आजच्याच दिवशी रचली गेली होती ‘World Wide Web’ची मुहूर्तमेढ

स्‍क्रीनद्वारे प्रक्षेपण

कोरोना महामारीमुळे चर्चमधील प्रार्थनागृहात गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना केल्‍या होत्या. या अंतर्गत प्रार्थनागृहात मर्यादित प्रवेश देण्यात आले, तर उर्वरित भाविकांना धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होता यावे, यासाठी आवारातच स्‍क्रीनद्वारे प्रक्षेपण दाखविण्यात आले. मध्यरात्री बाराला ख्रिस्‍ती बांधवांनी एकमेकांना नाताळाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.

सोशल मीडियावर (Social media) शुभेच्छांचा वर्षाव

चर्चमध्ये भाविकांची गर्दी झालेली असताना, सोशल मीडियावरही नाताळनिमित्त शुभेच्‍छांचा वर्षाव सुरू होता. मित्र, परिवार, आप्तेष्टांना नाताळ सणाच्‍या शुभेच्‍छा देण्यात आल्‍या. यासाठी शुभेच्‍छा संदेशासह दृकश्राव्‍य व चित्र स्‍वरूपातील संदेश व्‍हायरल होत होते.

Christmas
Christmas Train : ट्रेन पाहून नेटकऱ्याला हॅरी पाॅटरच्या सीनची आठवण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com