Cidco Shootout Case : 13 जणांवर मोक्काची कारवाई; सिडकोतील गोळीबार प्रकरणी अटक

 arrested
arrested esakal

Cidco Shootout Case : सिडको परिसरात गुन्हेगार आणि भाजपचा पदाधिकारी राकेश कोष्टी याच्यावर भरदिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणी सर्व १३ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

या संशयितांच्या टोळीवर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. (Cidco Shootout Case Action against 13 people arrest nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 arrested
Dhule Crime News : एलसीबीकडून तिघा चोरट्यांना अटक; तपासात न्याहळोदलाही कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार किरण शेळके (२९, अंबिका चौक, पंचवटी) त्याच्यासह जयेश हिरामण दिवे (३३, रा. पंचवटी), विकी कीर्ती ठाकूर (२८, रा. दसकगाव, नाशिक रोड),

गौरव संजय गांगुर्डे (३२, रा. पंचवटी), किरण ज्ञानेश्वर क्षीरसागर (२९, रा. पंचवटी), सचिन पोपट लेवे (२३, रा. क्रांतिनगर), किशोर बाबूराव वाकोडे (२२, रा. कथडा, जुने नाशिक), राहुल अजयकुमार गुप्ता (२८, रा. शनिचौक),

अविनाश गुलाब रणदिवे (२६, रा. सातपूर), श्रीजय संजय खाडे (२३, रा. जुना आडगाव), जनार्दन खंडू बोडके (२२, रा. पंचवटी), सागर कचरू पवार (२८, रा. गणेशवाडी), पवन दत्तात्रय पुजारी (२३, रा. तारवालानगर पंचवटी), महेंद्र ऊर्फ गणपत राजेश शिरसाट (२८, रा. दत्त चौक, पंचवटी) अशी संशयितांची नावे आहेत.

या टोळीवर विविध पोलिस ठाण्यांतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत यापूर्वीच पोलिस आयुक्त शिंदे यांनी दिले होते, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

 arrested
Nashik Crime News : दातली परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com