पवारांना धमकीप्रकरणी शहर NCP आकमक! आयुक्तांकडे निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी | City NCP attacked in case of threat to Pawar Request to file case through statement to Commissioner nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

City NCP Request to file case through statement to Commissioner

Sharad Pawar Threat: पवारांना धमकीप्रकरणी शहर NCP आकमक! आयुक्तांकडे निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी

Sharad Pawar Threat : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री शरद पवार यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून धमकी दिल्याप्रकरणी नाशिक शहर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शहर आयुक्त अंकुश शिंदे यांना निवेदन देत संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (City NCP attacked in case of threat to Pawar Request to file case through statement to Commissioner nashik news)

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच, ‘राजकारण महाराष्ट्राचे’ या फेसबुक पेजवरूनही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असे नाव आहे.

सौरभ पिंपळकर या ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात ट्विट करीत धमकी दिली आहे. पिंपळकर या नावाने असलेल्या ट्विटर अकाऊंटवर ही व्यक्ती अमरावतीची असून तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचे त्याच्या अकाऊंटवर दिसून येते.

सदरचे अकाऊंट कोणाचे याचा तपास करण्यात यावा. तसेच माजी खासदार निलेश राणे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून आक्षेपार्ह शब्दात टीका केली असून त्यावरूनही कार्यकर्त्यांचे मन दुखावल्याचे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या दोन्ही धमक्यांमुळे राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी केलेल्या टिकेमुळे राज्यातील वातावरण आणखी गढूळ होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता तातडीने संबंधितांवर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, अंबादास खैरे, योगिता आहेर, निवृत्ती अरिंगळे, संजय खैरनार, सलीम शेख, सुरेश आव्हाड, बाळासाहेब गीते, मनोहर कोरडे, मकरंद सोमवंशी, शंकर मोकळ, जगदीश पवार, आसिफ मुलाणी, नदीम शेख, योगेश दिवे, शशिकांत पवार, राजेंद्र शेळके, नाना पवार, गणेश पेलमहाले, साजिद मुलतानी, राजेश भोसले, रामभाऊ जाधव, समाधान तिवडे, योगिता पाटील, संगीता पाटील, पुष्पा राठोड, बाळा निगळ, जय कोतवाल, सुरेश भिंगारदिवे आदीं पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.