Citylinc Disability Free Card : दिव्यांग मोफत कार्डला 1 महिन्याची मुदतवाढ! | Citylinc Divyang Free Card been extended by 1 month nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Citylinc Disability Free Card

Citylinc Disability Free Card : दिव्यांग मोफत कार्डला 1 महिन्याची मुदतवाढ!

Citylinc Disability Free Card : दिव्यांगाना मोफत प्रवासासाठी सिटीलिंककडून देण्यात आलेल्या दिव्यांग मोफत कार्डला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली असून दिव्यांगांना आता ३० जूनपर्यंत कार्ड वापरता येणार आहे. (Citylinc Divyang Free Card been extended by 1 month nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महापालिका हद्दीतील दिव्यांग प्रवाशांना १ नोव्हेंबरपासून मोफत प्रवासासाठी सिटीलिंककडून मोफत दिव्यांग कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत सदर मोफत कार्डचा वापर दिव्यांग प्रवासी करू शकत होते.

त्यानंतर मोफत कार्डला २ महिन्यांची म्हणजे ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता पुन्हा एकदा दिव्यांग मोफत कार्डला मुदतवाढ देण्यात आली आहे. दिव्यांग प्रवाशांना आणखी एक महिना मोफत कार्डचे नूतनीकरण करण्याची गरज नाही.

३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार सद्यःस्थितीत त्यांचेकडे उपलब्ध असलेल्या कार्डचा वापर प्रवासासाठी करू शकतात. प्रवाशांनी कार्ड नूतनीकरणासाठी पास केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन सिटीलिंककडून करण्यात आले आहे.