MPSC Joint Prelims Exam : या तारखेला नागरी सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा; प्रवेश प्रमाणपत्र उपलब्‍ध |Civil Services Joint Prelims Exam of mpsc is on sunday nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC Exam

MPSC Joint Prelims Exam : या तारखेला नागरी सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा; प्रवेश प्रमाणपत्र उपलब्‍ध

Nashik News : ‘एमपीएससी’ तर्फे राज्‍यसेवा परीक्षेच्‍या संरचनेत बदल करण्यात आला असून, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षेच्‍या माध्यमातून विविध शासकीय सेवांकरिता भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील पहिल्‍या टप्यांत पूर्व परीक्षा होत आहे. आयोगातर्फे फेब्रुवारी महिन्‍यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. (Civil Services Joint Prelims Exam of mpsc is on sunday nashik news)

६७३ पदांसाठी भरती प्रक्रिया..

या परीक्षेच्‍या माध्यमातून एकूण ६७३ पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामध्ये सामान्‍य प्रशासन विभागातील २९५, पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता जलसंपदा, मृद व जलसंधारण विभाग १३०, सार्वजनिक बांधकाम विभाग १५, अन्न व नागरी विभाग ३९, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग १९४ पदांचा समावेश आहे.

ऑक्‍टोबरमध्ये मुख्य परीक्षांचे आयोजन

पूर्व परीक्षेतून पात्रताधारक उमेदवारांची मुख्य परीक्षा ऑक्‍टोबर महिन्‍यात घेतली जाणार आहे. जाहिरातीत नमूद वेळापत्रकानुसार राज्‍यसेवा मुख्य परीक्षा ७ ते ९ ऑक्‍टोबरदरम्‍यान घेतली जाईल.

तर महाराष्ट्र स्‍थापत्‍य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा १४ ऑक्‍टोबरला. निरीक्षक, वैधमापन शास्‍त्र, मुख्य परीक्षा २१ ऑक्‍टोबर आणि अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २८ ऑक्‍टोबर घेण्याचे नियोजित आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (ता.४) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षा २०२३ चे आयोजन केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्‍या उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्‍या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्‍या माध्यमातून उपलब्‍ध करून दिलेले आहे. दुसरीकडे जिल्‍हा प्रशासनाकडून परीक्षेच्‍या तयारीचे नियोजन आखण्यात आले आहे.

विशेष म्‍हणजे कोरोना काळात परीक्षा वेळापत्रक विस्कळीत झालेले असतांना आता परीक्षांचे नियोजन पूर्वपदावर येत आहे. जाहिरातीत नमूद दिनांकानुसार रविवारी (ता.४) परीक्षा होत आहे. आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्र उपलब्‍ध करून दिलेले आहे.

परीक्षेसाठी अर्ज केलेल्‍या उमेदवारांनी लॉगइन आयडीच्‍या सहाय्याने प्रवेश प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यायचे आहे.

तसेच परीक्षा सुरू होण्याच्‍या वेळेपूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्‍वतःच्‍या बैठक क्रमांकावर उमेदवारांनी उपस्‍थित राहावे, अशा सूचना आयोगातर्फे जारी केलेल्‍या आहेत. दुसरीकडे परीक्षार्थींची संख्या लक्षात घेता स्‍थानिक प्रशासनाकडून नियोजनाला वेग आला आहे.