Nashik Crime News : मालेगावातील गवळीवाडा भागात 2 गटात हाणामारी; 12 जणांविरुध्द गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beating

Nashik Crime News : मालेगावातील गवळीवाडा भागात 2 गटात हाणामारी; 12 जणांविरुध्द गुन्हा

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील कुसुंबा रोड भागातील गवळीवाडा येथे घराच्या छतावर पत्रे टाकण्याच्या वादातून शोएब सुलेमान खान व निझाम शेख सहिद या दोघाच्या गटात जोरदार हाणामारी झाली. या मारहाणीत दोघेजण जबर जखमी झाले.

दोन्ही गटांच्या परस्पर विरोधी तक्रारीवरून बारा जणांविरुद्ध दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. (Clash between 2 groups in Gawliwada area of ​​Malegaon case filed against 12 persons Nashik Crime News)

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

शोएब खान यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले, की घरावर पत्रे टाकण्याची कुरापत काढून माझ्यासह भाऊ अरबाज, आते भाऊ मोसीन, आत्या व भावजयीला निझाम शेख, गुलाम शेख, आदील, कामील (पूर्ण नाव समजू शकले नाही) व तीन अनोळखी इसमांनी लोखंडी रॉड, चाकू व लाठ्या-काठ्यांसह मारहाण केली. आत्या व भावजयीला नसीमाबानो व अन्य संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली असे तक्रारीत म्हटले आहे.

याउलट निझाम शेख याने दिलेल्या तक्रारीत सुलेमान खान, मोहसीन, शहबाज, अरबाज (पूर्ण नावे समजू शकली नाही) व अन्य संशयित अशा पाच जणांनी याच वादातून भाऊ बुरहान व आईस मारहाण केली. मी भांडण सोडविण्यास गेलो असता शहबाजने तसेच अन्य संशयितांनी काठी व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मारहाणीची माहिती समजताच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रीती सावजी, उपनिरीक्षक अनिल पठारे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस पोचण्यापूर्वीच संशयित फरार झाले होते. शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीवरून बारा जणांविरुद्ध दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.