esakal | पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश - संजय राऊत

बोलून बातमी शोधा

sanjay raut 1234.jpg

पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी दरम्यान सत्य बाहेर येईलच - संजय राऊत

पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश - संजय राऊत
sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी दरम्यान सत्य बाहेर येईलच मात्र चारित्र्यहनन करायचे बदनामी करायची असे प्रकार वाढीस लागतातयेत. संवेदनशील मुख्यमंत्री पांघरून घालणार नाही असे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत म्हणाले. ते आज नाशिकमध्ये शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गोगोई वक्तव्य

रंजन गोगोई यांनी न्यायव्यवस्थेसंदर्भात केलेले वक्तव्य गांभीर्याने पाहिले पाहिजे. रंजन गोगोई हे राज्यसभा सदस्य असल्याने त्यांनी टीका करणे आश्चर्यकारक आहे. उलट त्यांनी आता ते न्यायाधीश असताना घडलेल्या सगळ्या घटना समोर आणल्या पाहिजेत. 

शेतकरी आंदोलन गांभीर्याने घ्यावे

रशिया-म्यानमार मध्ये लोक रस्त्यावर आले. त्यामुळे भाजप सरकारने योग्य विचार करावा. पेट्रोलदर वाढ ,बेरोजगारी वाढली तर लोक रस्त्यावर उतरणारच.

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

राज्यपालांवर टिका

राज्यपाल सोबत शीतयुद्ध नाही.खुले युद्ध आहे. मंत्रिमंडळ शिफारशी बंधनकारक आहेत. ते राजकीय दबावाखाली आहेत

शिवजयंती मिरवणूक बंदी

प्रजेची काळजी म्हणून शिवजयंती मिरवणूकीवर बंदी घालण्यात आली आहे. यात संसर्ग पसरू नये म्हणून ही बंदी आहे. 

हेही वाचा -  नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून दीड वर्षाच्या चिमुरडीला पळविले; घटना CCTV मध्ये.

शरद पवार चीन वक्तव्य
शरद पवार संरक्षणमंत्री होते त्यांच्या काळात महत्वाचे करार चीन सोबत झाले,. त्यामुळे त्यांचे म्हणणे प्रश्न याबाबत गंभीरतेने विचार करायला हवा   तसेच याबद्दल संसदेत चर्चा होऊ दिली नाही हे संशयस्पद आहे 

पुलावामा बद्दल आश्चर्यच

या घटनेची माहिती आधीच कशी मिळाली हे गोस्वामी यांच्या चॅट मध्ये समोर आलंय