esakal | गोदावरीतून निघतंय लोखंड? उसळतेय गर्दी; महिलांची संख्या मोठी
sakal

बोलून बातमी शोधा

godavari

गोदावरीतून निघतंय लोखंड? उसळतेय गर्दी; महिलांची संख्या मोठी

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : गोदावरी नदीच्या (godavari river) पात्रातील काँक्रिटीकरण काढण्याच्या कामाला पुन्हा एकदा सुरवात झाली आहे. मात्र गतवेळेसारखेच पात्रात गाडल्या गेलेल्या स्टील (लोखंड) (iron) काढण्यासाठी पुन्हा मोठी गर्दी (crowd) उसळू लागली आहे.

नदीपात्रातील काँक्रिटीकरण

या गर्दीत पूर्वी तरूणांची संख्या मोठी होती, आता त्यात महिलांही हे लोखंड गोळा करण्यासाठी गर्दी करत असल्याने व संबंधितांच्या बाजूला होण्याच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत असल्याने याठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी गोदापात्रातील काँक्रिटीकरणामुळे मूळ जलस्त्रोत पात्रात गाडले गेल्याचा मुद्दा उच्च न्यायालयात दाखल झाल्यावर न्यायालयाने हा काँक्रिटीकरणाचा थर काढून पुन्हा नदीपात्रातील मूळ स्त्रोत तपासण्याचे आदेश दिले. त्यानंतर गेल्या दीड वर्षापासून नदीपात्रातील काँक्रिटीकरण काढण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा: अखेर आजी-आजोबांनी कोरोनाला हरविले! घरीच उपचार

मोठी गर्दी उसळली

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मध्यंतरी हे काम ठप्प होते. आता ते पुन्हा सुरू झाले असून गाडगे महाराज पुलालगतचे काँक्रिटीकरण काढण्याचे काम सुरू आहे. पोकलॅन्ड, जेसीबीद्वारे हे काम सुरू आहे. मात्र सकाळच्या सुमारास हे काम सुरू होताच नदीपात्रात दडलेले लोखंड काढण्यासाठी मोठी गर्दी उसळते. त्यामुळे संबंधितांना हे काम करताना खूप काळजी घ्यावी लागते.अपघाताची शक्यता
यंत्राद्वारे हे काम सुरू आहे. मात्र लोखंड गोळा करण्यासाठी आलेले अनेकजण काम सुरू असतानानाच थेट मशीनखाली घुसून लोखंड काढण्याचा प्रयत्न करत असल्याने भविष्यात याठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता आहे. कारण काम सुरू झाल्यावर लगेचच पंधरा वीसजण मशीनला गराडा घालत लोखंड शोधू लागतात. यावेळी संबंधित कर्मचारी काही बोलला तरी त्याचीही दखल न घेता लोखंडाचा शोध सुरू होतो. याठिकाणी अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

हेही वाचा: ...तरीही महापालिकेने मागविले पाच हजार इंजेक्शन?

महिलांची संख्या वाढली
नदीपात्रातील खोदकाम सुरू झाल्यापासून हे लोखंड गोळा करण्यासाठी मोठी गर्दी उसळत आहे. विशेष म्हणजे गोळा करणारांना हटकनारे कोणीच नसल्याने दिवसेंदिवस हे लोखंड गोळा करण्यासाठी होणा-या गर्दीत वाढत होत आहे. विशेष म्हणजे पूर्वी यात भिकारी, भंगार गोळा करहणारे, गर्दुल्ले मोठ्या प्रमाणावर दिसायचे. आता याठिकाणी महिलांची संख्या वाढू लागल्याने भविष्यात दगड लागून कोणी जखमी किंवा जायबंदी झाल्यास जबाबदारी कोणाची, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

loading image