गोदावरी घाटावरील पूलाचे काम आयुक्तांकडून रद्द

Ramesh Pawar Nashik Municipal Commissioner
Ramesh Pawar Nashik Municipal Commissioner esakal

नाशिक : महापालिकेवर 2800 कोटीचा आर्थीक बोजा असतांना आर्थीक शिस्त लावण्यासाठी कठोर निर्णय घेतांना महापालिका आयुक्त रमेश पवार (Municipal Commissioner Ramesh Pawar) यांनी गोदावरी घाटावर अवघ्या 500 मीटर अंतरात तीन पूल उभारण्याचे उधळपट्टी थांबविण्यासाठी एक पूलाचे काम रद्द केले करण्याचा निर्णय घेतला.

तिसऱ्या पुलाचे काम बंद करण्याचा निर्णय

महापालिका (NMC) आयुक्त रमेश पवार दोन आठवड्यापासून महापालिकेच्या आर्थीक बेशिस्तीचा अभ्यास करीत आहे. त्यांनी आल्या दिवसांपासून आर्थीक बेशिस्तीचा आढावा घेउन त्यावर ठोस उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. त्यानुसार पहिला दणका देतांना त्यांनी गोदावरी नदीवर चोपडा लाॅन्स ते आसारामबापू पूल या दरम्यान तिसऱ्या पुलाचे काम बंद करण्याचा निर्णय घेतला.

Ramesh Pawar Nashik Municipal Commissioner
Nashik | अवघ्या १२ तासात जलतरण तलावातून १ लाख ६६ हजाराची कमाई

भूसंपादन टार्गेटवर

मागील दोन वर्षात महापालिकेने 800 कोटी रुपये भूसंपादनावर खर्ची केले. एका बाजूला कर्मचाऱ्यांचे पगार करायला पैसे नाही. स्पील ओव्हर 2800 कोटीवर पोहोचला आहे. येत्या काळात निवडणूक होणार आहे. त्यामुळे महापालिकेला आर्थीक शिस्त लावावी लागणार आहे.

Ramesh Pawar Nashik Municipal Commissioner
पंचवटी विभागीय कार्यालयाकडून अतिक्रमण मोहीम | Nashik

आयुक्तांपुढे कठोर निर्णय घेण्याचे आव्हान

महापालिका आयुक्तांपुढे कठोर निर्णय घेण्याचे आव्हान आहे. मागील दोन वर्षात सुमारे 800 कोटी रुपये भूसंपादनावर वाटले गेले. पहिल्या वर्षी 356 कोटी तर मागील वर्षी 430 कोटी रुपये दिले असतांना यंदाच्या वर्षी पून्हा 40 ते 44 कोटीचे भूसंपादन पैसे देण्याच्या फायली अंतिम टप्प्यात असल्याने आयुक्तांनी हे सगळे थांबवून कडक उपाय सुरु केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com