संत निवृत्तीनाथ महाराज वारी : वारकरी मंडळीत संभ्रम

sant nivruttinath wari
sant nivruttinath wariesakal

नाशिक : कोरोना लॉकडाउनमुळे (corona virus) यंदा सलग दुसऱ्यांदा संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या वारीविषयी वारकरी मंडळींत संभ्रमावस्था आहे. लॉकडाउनमुळे शासनाने पायी वारीला हिरवा कंदील दिलेला नाही. शासनाने आदेश न दिल्याने विश्वस्‍त संस्थांना शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे दोनशेहून अधिक वर्षांची वारी परंपरा असलेल्या पायी वाऱ्या अव्याहत सुरू ठेवाव्यात, असा वारकरी मंडळींचा आग्रह आहे. (Confusion-about-Sant-Nivruttinath-Maharaj-Wari-nashik-marathi-news)

वारीसाठी समिती नेमण्यासाठी साकडे

वारीसाठी राज्यातील विविध भागांतील दिंड्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यंदाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घालून किमान ५०० किंवा २०० वारकऱ्यांना पायी वारीची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र, राज्यातील १४ जिल्हे रेड झोनमध्ये असल्याने शासनस्तरावर वाऱ्यांबाबत काय निर्णय घ्यायचा, याचा निर्णय मंत्रिमंडळ स्‍तरावर प्रलंबित आहे. शासनाची परवानगी नसल्याने वारकऱ्यांच्या आग्रहाबाबत विश्वस्त मंडळही मौनात आहे. परवानगीच नसेल, तर तयारी कशी करायची आणि काय करायची, असा प्रश्न आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे संभ्रमावस्था आहे.

धर्मादाय आयुक्तांना साकडे

त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तिनाथांच्या वारीला परवानगी द्यावी, या मागणीचे निवेदन माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी धर्मादाय आयुक्तांना दिले असून, वारीसाठी त्वरित समिती नेमण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पंढरपूर येथील आषाढी वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागांतून निघणाऱ्या वाऱ्यांसाठी हजारो वारकरी सहभागी होतात, पण दोन वर्षांपासून या वारीला कोरोनाची तीट लागली आहे. गेल्या वेळी राज्य शासनाने लॉकडाउनमुळे वाहनातून वारी काढण्यास परवानगी दिली. त्यानुसार देहू, आळंदी, त्र्यंबकेश्वर, सासवडसह विविध भागांतून वाऱ्या निघाल्या. परंपरा कायम राहिली. मात्र, लॉकडाउननिमित्त राज्यातील काही संस्थानांवर विश्वस्त मंडळाची मुदत संपली. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी नियुक्त झाले. सहाजिकच, वर्षानुवर्षे पायी वारीत सहभागी होणारे वारकरी यंदा नसल्याने प्रशासकीय अधिकारी व त्यांची समिती पायी वारीत सहभागी होणार का? किमान वारी तरी निघणार का, हा कळीचा मुद्दा आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राज्यातील वारी विश्वस्तांच्या बैठका झाल्या. किमान ५००, २०० किंवा १०० जणांना परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र, शासनाचे वारीसंदर्भात आदेश नाहीत. आठवडाभरात आदेश यावेत, अशी अपेक्षा आहे. आदेशातील मार्गदर्शक सूचनांनुसार वारीबाबत पुढील निर्णय घेता येईल. मात्र, तूर्तास आदेशाची प्रतीक्षा आहे.-ॲड. भाऊसाहेब गंभिरे, विश्वस्त, प्रशासकीय मंडळ, निवृत्तिनाथ महाराज देवस्थान

sant nivruttinath wari
कोविड रुग्णसेवा अखंडितपणे सुरू ठेवणार; हॉस्पिटल ओनर असोसिएशन

श्री निवृत्तिनाथांच्या वारीला सुमारे २५० वर्षांची परंपरा आहे. यंदा मोजक्या वारकऱ्यांची का होईना पायी वारी निघावी, अशी अपेक्षा आहे. नियमांचे पालन करून यंदा पायी वारीला परवानगी दिली पाहिजे. वारीला खंड पडू देऊ नका. -ह.भ.प. पुंडलिकराव थेटे, माजी विश्वस्त तथा पालखीप्रमुख संत

श्री निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधी मंदिराची विश्वस्त समिती संपुष्टात आल्याने प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे वारीविषयी हजारो वारकऱ्यांमधील संभ्रम दूर होण्याची गरज आहे. पुरुष-महिला वारकऱ्यांची समिती नेमावी, अशी मागणी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे.

-ललिता शिंदे, माजी विश्वस्त, निवृत्तिनाथ महाराज देवस्थान संस्थान

आषाढी पायी वारी महाराष्ट्राची संस्कृती आहे. शासनाने पर्यायी व्यवस्था करावी. या वर्षी पायी वारी झालीच पाहिजे. शासनाने निर्बंध घातले तरी समस्त नाशिककरांतर्फे माझे सागणे आहे, की श्री निवृत्तिनाथांची पायी वारी होणारच. -संजय महाराज धोंडगे, माजी विश्वस्त

sant nivruttinath wari
नाशिक जिल्ह्यात सोशल मीडियावर हनी ट्रॅपचा धोका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com