बिटको रुग्णालयात ऑनलाइन, ऑफलाइन लसीकरणामुळे गोंधळ!

vaccination
vaccinationesakal

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : महापालिकेच्या जेडीसी बिटको रुग्णालयात (bitco hospital) सोमवारी (ता.२४ ) ऑनलाइन आणि ऑफलाइन (online and offline) असे दोन्ही प्रकारचे लसीकरण (vaccination) होते. त्यामुळे येथे एकच गोंधळ उडाला. याविषयी नागरिकांना समजावून सांगताना डॉक्टरांची दमछाक झाली. बिटकोत सोमवारी (ता.२४) ऑनलाइन , ऑफलाइन लसीकरण होते. (online-offline-vaccination-bitco-hospital)

बिटको रुग्णालयात ऑनलाइन, ऑफलाइन लसीकरणामुळे गोंधळ

ऑनलाइन नोंदणी केलेल्या नागरिकांनाच लस मिळेल, पहिली लस असेल त्यांनाच प्राधान्य दिले जाईल, अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे नागरिक संतप्त झाले. त्यांनी आमचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन नाही, आम्हाला त्याविषयी समजत नाही. बिटकोत ऑफलाईन साठीच लसीकरण ठेवावे, अशी मागणी केली. बिटको रुग्णालयात सोमवारी कोव्हिशील्ड लस उपलब्ध होती. सोशल मीडियात याविषयी पोस्ट व्हायरल झाली. त्याप्रमाणे अनेक नागरिक लस घेण्यासाठी बिटको रुग्णालयात हजर झाले. येथे आल्यानंतर केवळ ४० टक्के नागरिकांचे ऑफलाइन लसीकरण होईल, उर्वरित ६० टक्क्यांमध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना पहिला डोस दिला जाईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचा गोंधळ उडाला.

vaccination
स्थायी समितीवर सदस्य वाढीसाठी भाजपच्या हालचाली

बिटकोत लस संख्या वाढवून देण्याची गरज

या वेळी नागरिकांचा संताप पाहून डॉ. कमलेश खैरनार यांनी नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तरीही नागरिकांना ऑनलाइन आणि ऑफलाइनचा गोंधळ लवकर लक्षात येत नव्हता. डॉक्टरांनी सर्वांना व्यक्तिगत सविस्तर माहिती दिली. बिटको रुग्णालय नाशिक रोडच्या मध्यवर्ती भागात आहे. लसीकरणासाठी येथे कायम गर्दी केली जाते. येथे इतर लसीकरण केंद्रापेक्षा सर्वाधिक कमी लस येत असल्याची चर्चा कायम केली जाते. बिटकोत लस संख्या वाढवून देण्याची गरज आहेत.

vaccination
वीस लाख लोकसंख्येसाठी अवघे बारा मानसोपचारतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com